News Hindi

नोटबुक मधील 'नै लगदा' गाणे – विहंगमय श्रीनगर मध्ये गुंजणारे विरहगीत


जहीर इक़बाल यांनी हताश प्रियकराची भूमिका चांगली वठवली आहे तसेच प्रनूतन बहल सुद्धा स्क्रीनवर शोभून दिसतात.

Mayur Lookhar

पाकिस्तानचे महान गायक नुसरत फतेह अली खान यांच्या 'तेरे बिन नहीं लगदा' या गाण्याचे अनेक भारतीय व्हर्जन्स आपण ऐकले आहेत. नोटबुक मधील 'नै लगदा' हे गाणे या गाण्याचे रीमिक्स नसून फक्त गाण्याचे शीर्षक या नवीन गाण्याशी मेळ खाते.

नोटबुक या चित्रपटाची निर्मिती सलमान खान ने केली असून जहीर इक़बाल आणि प्रनूतन बहल यांची प्रमुख भूमिका आहे.

गीतकार अक्षय त्रिपाठी यांनी नवीन शब्द लिहले असले तरी गाण्याचा विरहाचा भाव तसाच ठेवला आहे. उत्तम संगीत आणि गायकीमुळे हे गाणे बाजी मारून जाते. वेस्टर्न आणि शास्त्रीय वाद्यांच्या मिश्रणामुळे गाण्याचा प्रभाव आणखी वाढतो.

संगीतकार विशाल मिश्र यांनीच हे गाणे गायले आहे. या गाण्याला आवश्यक असणारे भाव त्यांच्या आवाजात आहेत, खासकरून गाण्याचा अंतरा त्यांनी अत्यंत खुबीने गायला आहे.

असीस कौरचे नाव सहगायिका म्हणून देण्यात आले आहे पण आपल्याला या विडिओत त्यांचा आवाज ऐकायला मिळत नाही. त्यांचा आवाज ऐकण्यासाठी आपल्याला पूर्ण ऑडिओ ट्रॅक रिलीज होण्याची वाट पाहावी लागणार.

एक सुखद रोमँटिक गाण्यासाठी फक्त भावनेची गरज असते. येथे जहीर इक़बाल यांनी हताश प्रियकराची भूमिका चांगली वठवली आहे तसेच प्रनूतन बहल सुद्धा स्क्रीनवर शोभून दिसतात.

या गाण्याची तुलना नुसरत फतेह अली खानच्या गाण्याशी करता येत नसली तरी विशाल मिश्रच्या 'नै लगदा' या गाण्याची स्वतःची अशी एक वेगळी ओळख नक्कीच आहे.

नोटबुक २९ मार्च ला रिलीज होणार आहे. दोन्ही गाणी इथं पहा.

 

Related topics

Song review