News Marathi

विशेष: अंजली पाटील मराठी स्पोर्ट्स बायोपिक मध्ये


हुतात्मा असे शीर्षक असलेल्या एका मराठी वेब-सिरीज मध्ये सुद्धा त्या अभिनय करत आहेत.

Keyur Seta

सिनेस्तान.कॉम शी विशेष गप्पा मारताना अंजली पाटील यांनी सांगितले की त्या मराठी मध्ये एका खेळाडूवर बनणाऱ्या बायोपिक मध्ये अभिनय करत आहेत.

"मी एका ऑलम्पिक खेळाडूवर मराठी मध्ये बनणाऱ्या बायोपिक मध्ये अभिनय करणार आहे," मेरे प्यारे प्राइम मिनिस्टर चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान गप्पा मारताना त्या म्हणाल्या.

जेव्हा त्यांना चित्रपटाबद्दल अजून काही माहिती देण्यास सांगितले तेव्हा त्यांनी नॉन-डिस्क्लोजर अग्रीमेंट (खुलासा न करण्याचा करार) मुळे यावर काही बोलण्यास नकार दिला.

त्या फक्त हा एकच मराठी प्रोजेक्ट मध्ये व्यस्त नाही आहेत, त्या जयप्रद देसाई दिग्दर्शित हुतात्मा या मराठी वेब-सिरीज मध्ये सुद्धा अभिनय करत आहेत. ही सिरीज १९५६ च्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीवर आधारित आहे.

"मी आता झी5 साठी हुतात्मा नावाची वेब-सिरीज करत आहे. हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे. मी प्रमुख भूमिकेत आहे. हा खूप थकवणारा प्रजेक्ट आहे आणि मला या प्रोजेक्ट मध्ये एक अभिनेत्री म्हणून माझ्या सर्व कलागुणांना पणाला लावावे लागले," त्या म्हणाल्या.

देसाई यांनी नागरिक (२०१५) या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. चित्रपटात सचिन खेडेकरांनी एक प्रामाणिक पत्रकाराची भूमिका केली होती तर मिलिंद सोमणनी एका दुष्ट राजकारण्याची भूमिका केली होती.

Related topics

Zee5