{ Page-Title / Story-Title }

News Hindi

'बकैती' गाणे – सुखविंदर सिंह १९९०च्या दशकाची आठवण करून देणाऱ्या गाण्यात रंग भरतात


सुखविंदर सिंह यांनी गायलेल्या या गाण्याला राणा मझुमदार यांनी संगीत दिले असून अमिताभ भट्टाचार्यांनी गाण्याचे शब्द लिहले आहेत.

Shriram Iyengar

सध्या रीमिक्सच्या या गोंगाटात ओरिजिनल संगीतबद्ध केलेले गाणे ऐकायला मिळणे एक सुखद धक्काच आहे. दिग्दर्शक तिग्मांशु धुलिया यांच्या मिलन टॉकीज चित्रपटातील 'बकैती' या गाण्यात ९०च्या दशकातील संगीताचा बाज अगदी योग्य पकडला आहे.

सुखविंदर सिंह यांच्या आवाजात अली फजलच्या पात्राची ओळख करून दिली आहे जो 'बॉलिवूड' चित्रपटां पासून प्रेरित होऊन स्वतः दिग्दर्शक बनण्याची स्वप्न पाहत आहे.

व्हिज्युअल्स मध्ये आपल्याला अली फजलची स्वतःचा चित्रपट बनवताना चाललेली धडपड दाखवली आहे. अगदी लग्नाच्या मंडपातून नवरीला पळून जाण्यास मदत करण्या पासून ते दीवार मधल्या अमिताभ बच्चनच्या वेशात गुंडांशी मारामारी करण्या पर्यंत असे हिंदी सिनेमां मधले सगळे प्रयोग फजल आपल्या चित्रपटात करून पाहत आहे.

एक जिद्दी तरुण जो आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे हीच या चित्रपटाची थीम आहे. 'बकैती' गाण्यात मोठी स्वप्न पाहणाऱ्याचा मजाक उडवणाऱ्या लोकांवर टीका केली आहे.

अमिताभ भट्टाचार्य यांची मजेशीर शब्दरचना मुख्य पात्राच्या क्रांतिकारी स्वभावाशी मेळ खाते. पण राणा मझुमदार यांचे संगीत हे तुमचे लक्ष वेधून घेते. संमोहित करून टाकणाऱ्या बीट्समुळे आणि सिन्थेसायझर्सच्या मिक्स मूळे गाणे अधिक प्रभावशाली झाले आहे.

नव्वद च्या दशकातल्या संगीताचा बाजामध्ये हे गाणे बनवले आहे. जरी हे गाणे विशाल भारद्वाजांच्या 'धन ते नन' इतके प्रभावशाली नसले तरी या गाण्याचा टेम्पो थोडाफार त्याच गाण्यासारखा असल्यामुळे गाणे आपल्यावर पकड बनवून ठेवते.

शेवटी, नॉस्टॅल्जिया मुळे आणि एनर्जी मुळे गाणे ऐकण्यालायक झाले आहे. मिलन टॉकीज १५ मार्च ला रिलीज होईल. गाणे खाली पहा.

Related topics

Song review