{ Page-Title / Story-Title }

News Hindi

क्रिमिनल जस्टीस ट्रेलर – खूनाचा आरोप, पण विक्रांत मसीं ना काहीच आठवत नाही


२००८ साली आलेल्या ब्रिटिश टीव्ही सिरीज क्रिमिनल जस्टीस चा हा अधिकृत रीमेक आहे. अमेरिकेत पण २०१६ मध्ये या सिरीजचा 'द नाइट ऑफ' नावाने रीमेक केला होता.

Sonal Pandya

हॉटस्टार वरील क्रिमिनल जस्टीस मध्ये विक्रांत मसी साकारत असलेला आदित्य एका वन नाइट स्टॅन्ड नंतर खूनाच्या आरोपाखाली अटक होतो.

आदित्य एक टॅक्सी ड्रायवर आहे. एक रात्री त्याची एका महिलेबरोबर भेट होते आणि ते एकत्र रात्र घालवतात. दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा खून झालेला असतो आणि आदित्य एकमेव संशयित आहे.

त्याला फसवण्यात आलंय का तो खरंच एक खुनी आहे? २००८ साली आलेल्या ब्रिटिश टीव्ही सिरीज क्रिमिनल जस्टीस चा हा अधिकृत रीमेक आहे.

सिरीज मध्ये पंकज त्रिपाठी आदित्य च्या वकिलाच्या भूमिकेत आहेत तर जॅकी श्रॉफ यांनी जेल मधल्या एका गुन्हेगाराची भूमिका साकारली आहे. मिता वशिष्ठ सरकारी वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

मसी आणि त्रिपाठी ने गेल्या वर्षी आलेल्या ऍमझॉन प्राइम वरील मिर्झापूर सिरीजमध्ये एकत्र काम केले आहे.

बाफ्ता अवॉर्ड जिंकलेल्या या सिरीजचा अमेरिकेमध्ये २०१६ ला द नाइट ऑफ नावाने रीमेक केला आहे. रिझ अहमद या अभिनेत्याला त्यांच्या अभिनयासाठी उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.

एपलॉज एंटरटेनमेंट आणि बीबीसी इंडिया यांची निर्मिती असलेली ही सिरीज ५ एप्रिल पासून हॉटस्टार वर उपलब्ध असेल. ट्रेलर खाली पहा.

Related topics

Hotstar Trailer review