News Marathi

वेडिंग चा शिनेमा ट्रेलर – या हलक्याफुलक्या विनोदी चित्रपटामध्ये भाऊ कदम, प्रवीण तरडे आणि मुक्ता बर्वे बनले विडिओग्राफर


शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

Keyur Seta

सलील कुलकर्णी दिग्दर्शित वेडिंग चा शिनेमा चा ट्रेलर बडजात्यांच्या चित्रपटांची आठवण करून देतो. सासवड वरून आलेला प्रकाश (शिवराज वायचळ) आणि मुंबईची डॉ परी (ऋचा इनामदार) यांच्या लग्नाच्या तयारी भोवती हा चित्रपट फिरतो. ते दोघेही प्रेमात पडतात आणि लग्न करायचं ठरवतात.

फिल्ममेकर पूर्वी (मुक्ता बर्वे) आपल्या दोन साथीदारांसह (भाऊ कदम आणि प्रवीण तरडे) विवाह पूर्वीचे इव्हेंट्स शूट करायला तिथे येते. दोन्ही कुटुंबांमध्ये घडणाऱ्या गमतीजमती पूर्वीची टीम आपल्या कॅमेरात कैद करते.

दोन्ही कुटुंबांचे फिल्ममेकिंग प्रक्रिये विषयी असलेले अज्ञान आणि लग्नापूर्वीचे इव्हेंट्स शूट करण्याच्या या हल्लीच्या ट्रेंड विषयी असलेले अज्ञान यामुळे काही विनोदी प्रसंग घडतात.

वायचळ आणि इनामदार या दोघांची पण कौटुंबिक आणि सामाजिक पार्श्वभूमी एकमेकांपासून भिन्न आहे. अलका कुबल, भाऊ कदम, प्रवीण तरडे, शिवाजी साटम आणि सुनील बर्वे अशी सहकलाकारांची तंगडी फौज या सिनेमाला लाभली आहे.

मुक्ता बर्वे नेहमी प्रमुख भूमिका करतात त्यामुळे यावेळी सह कलाकाराच्या भूमिकेत त्या करतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. एवरेस्ट एंटरटेनमेंट निर्मित वेडिंग चा शिनेमा १९ एप्रिल ला रिलीज होईल. ट्रेलर खाली पहा.

Related topics

Trailer review