बॅनर्जींच्या चित्रपटात उत्तर प्रदेश मध्ये म्हाताऱ्या लोकांना व्याघ्र प्रकल्पासाठी राखीव असलेल्या जंगलात सोडून त्यांच्या मृत्यूबद्दल सरकारकडून मोबदला मिळवण्याच्या प्रथेवर प्रकाश टाकला आहे.
रिंगो बॅनर्जी दिग्दर्शित ब्लॅकगोल्ड मध्ये शायनी अहुजा पत्रकाराच्या भूमिकेत
मुंबई - 27 Mar 2019 21:58 IST


Roushni Sarkar
दिग्दर्शक रिंगो बॅनर्जी आपल्या ब्लॅकगोल्ड या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत. शायनी अहुजा घोस्ट (२०१२) नंतर पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर दिसतील.
बॅनर्जींच्या चित्रपटात उत्तर प्रदेश मध्ये म्हाताऱ्या लोकांना व्याघ्र प्रकल्पासाठी राखीव असलेल्या जंगलात सोडून त्यांच्या मृत्यूबद्दल सरकारकडून मोबदला मिळवण्याच्या प्रथेवर प्रकाश टाकला आहे.
द टाइम्स ऑफ इंडिया वर्तमानपत्राशी बोलताना बॅनर्जी म्हणाले, "उत्तर प्रदेश मध्ये खरोखर अशा घटना घडल्या होत्या. घरातली तरुण लोक कुटुंबातल्या वयस्कर व्यक्तीला जंगलात सोडत जेणेकरून वाघ त्यांच्यावर हमला करेल आणि नंतर कुटुंबीय त्यांचे शव जवळ उघड्या प्रदेशात आणून ठेवत."
चित्रपटात अहुजा एका फ्रीलान्स पत्रकाराच्या भूमिकेत आहेत जो स्टोरी च्या शोधात असताना एका लग्नात येतो जिथे हुंड्यावरून बोलणे चालू असते आणि त्यावरून खूप मोठ्या रॅकेट ला वाचा फुटते.
बॅनर्जी म्हणाले, "या चित्रपटातून नेहमी वाघ हत्या करतात हा गैरसमज दूर करायचा प्रयत्न करत आहोत. माणसंच माणसाला मारून वाघावर त्याचा दोष टाकत असत".
बॅनर्जी पुढे म्हणाले, "हा सगळा प्रकार कुटुंबाच्या सहमतीने होतो आणि याबद्दल त्यांना जाब विचारल्यावर मोठ्यांनी आपल्या मुलांसाठी जीव देणे हे त्यांचे कर्तव्य आहे असे उत्तर भेटते."
मे महिन्याच्या शेवटी पश्चिम बंगाल च्या बकसा टायगर रिजर्व मध्ये चित्रपटाची शूटिंग होणार आहे. बॅनर्जी म्हणाले उत्तर प्रदेश मध्ये चित्रपट शूट होऊ शकत नाही कारण तिथली स्थानिक लोकं याबद्दल बोलण्यास तयार नाहीत. तरीही ते काही दृश्ये ओडिसा आणि मध्य प्रदेश मध्ये शूट करणार आहेत.
शायनी अहुजा व्यतिरिक्त ब्लॅकगोल्ड मध्ये आशिष विद्यार्थी आणि सुबरत दत्ता यांच्या सुद्धा भूमिका आहेत.