News Hindi

नेटफ्लिक्स फक्त मोबाइल धारकांसाठी रु२५० दर महिना हा नवीन प्लॅन सुरु करण्याच्या तयारीत


मलेशिया सारख्या देशात सुद्धा असे प्लॅन्स सुरु करून पाहिले आहेत.

Our Correspondent

नेटफ्लिक्स भारतातल्या प्रेक्षकांसाठी २५० रुपये महिना असे स्वस्त सब्स्क्रिप्शन प्लॅन सुरु करायच्या विचारात आहे. पण हे फक्त मोबाइलवरच पाहता येतील आणि विडिओ क्वालिटी सुद्धा स्टॅंडर्ड असेल.

नेटफ्लिक्स च्या प्रवक्त्याने या बातमीला दुजोरा देत म्हटले की "आम्ही काही देशांमध्ये या बाबतीत वेगवेगळे प्रयोग करून पाहणार आहोत ज्यात मेम्बर्सना कमी पैशात मोबाईलवर नेटफ्लिक्स चे प्रोग्राम आणि चित्रपट पाहता येतील."

सध्या भारतात ५०० रुपये महिना चे प्लॅन चालू आहे.

सध्या तरी हे सर्व प्रायोगिक तत्वावर होत आहे त्यामुळे कदाचित हे प्लॅन्स सर्वांसाठी उपलब्ध नसतील. "हे प्लॅन्स सर्वांसाठी नसल्यामुळे कदाचित प्रायोगिक तत्वावर अमलात आणल्यानंतर आम्ही हे प्लॅन्स कॅन्सलसुद्धा करू शकतो," प्रवक्ता म्हणाले.

भारतातल्या ओटीटी प्लॅटफॉर्म्स च्या गर्दीमध्ये सगळ्यात पुढे राहण्यासाठी या नवीन क्लुप्त्या वापरल्या जात आहेत. ऍमेझॉन प्राइम विडिओ, हॉटस्टार आणि झी५ सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्म्स कडून कडवी टक्कर नेटफ्लिक्सला भेटत आहे.

नेटफ्लिक्स ने गेल्या नवेंबर मध्ये मलेशिया आणि इतर काही देशांमध्ये हे मोबाईल चे प्लॅन्स टेस्ट करून पहिले. अजून अधिकृत रित्या नेटफ्लिक्सने हे प्लॅन्स कुठेच सुरु केलेले नाहीत. 

Related topics

Netflix