News Hindi

'घर मोरे परदेसीया' मध्ये माधुरी दीक्षित स्वतः माझ्यासोबत डान्स करत नव्हत्या ही खरंतर चांगलीच गोष्ट आहे – आलिया भट्ट


आलिया या गाण्याची शूटिंग चालू असताना माधुरी दीक्षित बरोबर अभिनय करताना किती जास्त नर्व्हस होत्या सांगितले.

Keyur Seta

अभिषेक वर्मन च्या कलंक मधील 'घर मोरे परदेसीया' हे अतिशय भव्यदिव्य गाणे नुकतेच रिलीज झाले. उत्कृष्ट संगीत आणि श्रेया घोषाल यांच्या सुमधुर आवाजामुळे गाणे श्रवणीय झाले.

कलंक मध्ये पहिल्यांदाच आलिया भट्ट माधुरी दीक्षित नेने बरोबर काम करणार आहेत.

गाण्याच्या मेकिंग च्या विडिओ मध्ये आलिया ने त्या किती नर्व्हस होत्या हे सांगितले. "मी या गाण्याच्या शूटिंगच्या वेळी खूप नर्व्हस होते, कारण मी कधीच कथक शिकले नाही, माधुरी मॅम पण तिथे उपस्थित होत्या, नशीब त्या माझ्यासोबत डान्स करणार नव्हत्या कारण मग मला काहीच सुचलं नसतं," आलिया भट्ट म्हणाल्या.

गाण्या बद्दल सांगताना माधुरी दीक्षित म्हणाल्या, "या गाण्यात आलिया व माझ्या पात्राच्या नात्या बद्दल माहिती मिळते, हे भजन असले तरी आजच्या काळाला साजेशे आहे."

हिरामंडी गावा मध्ये राम नवमी दरम्यान ही कथा घडते. "आलियाचे पात्र प्रथमच हिरामंडीत आले आहे. रस्त्यावर रामायण नाटक चालु आहे," नृत्य दिग्दर्शक रेमो डिसूजा म्हणाले.

गाण्यात वरुण धवन चे पात्र जफर आलिया ला पाहून तिच्याकडे आकर्षित होते. अगदी खूप कमी वेळात त्यांनी रामायणाची कथा गाण्यातून सांगितली आहे.

Related topics