{ Page-Title / Story-Title }

News Hindi

छप्पाक फर्स्ट लुक – दीपिका पदुकोण मालती च्या रूपात


मेघना गुलझार दिग्दर्शित छप्पाक १० जानेवारी २०२० ला रिलीज होईल.

Sonal Pandya

छप्पाक चित्रपटाच्या शूटिंग ला सोमवार पासून नवी दिल्ली ला सुरुवात झाली आणि चित्रपटातील दीपिका पदुकोण चा फर्स्ट लुक रिलीज करण्यात आला, त्याच बरोबर चित्रपटाची रिलीज डेट सुद्धा निश्चित करण्यात आली.

१० जानेवारी २०२० ला हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये दाखल होईल.

ऍसिड हमल्यात वाचलेल्या लक्ष्मी अगरवाल यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित आहे. हमल्यातून बचावल्यानंतर त्या आपल्या सारख्याच अनेक मुलींची मदत करण्यासाठी समाजसेविका बनल्या. चित्रपटात विक्रांत मसी मालतीच्या जोडीदाराची भूमिका साकारणार आहेत.

दीपिका पदुकोण म्हणाल्या की मालती चे पात्र त्यांच्या कायमचे स्मरणात राहील. दीपिका पदुकोण च्या चेहऱ्यावर मेकअप आणि प्रोस्थेटिक चा वापर केला आहे.

मेघना गुलझार यांच्या मते मालती म्हणजे धैर्य आणि आशा चे दुसरे रूप आहे, तर विक्रांत मसी यांच्या मते मालती म्हणजे तुम्ही किंवा मी ही असू शकतो.

फॉक्स स्टार स्टुडिओज, दीपिका पदुकोण यांची का एंटरटेनमेंट आणि मेघना गुलझार यांचे म्रिगल एंटरटेनमेंट यांनी मिळून चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Related topics

Poster review