{ Page-Title / Story-Title }

News Hindi

पीएम नरेंद्र मोदी मध्ये जावेद अख्तर, समीर यांची जुनी गाणी वापरल्यामुळे त्यांना ट्रेलरमध्ये क्रेडिट दिले – निर्माते संदीप सिंह


निर्माते संदीप सिंह यांनी म्हटले की नरेंद्र मोदींवर बनलेल्या जीवनपटात जावेद अख्तर आणि समीर अंजान यांची जुनी गाणी वापरली आहेत आणि याचसाठी त्यांना चित्रपटात क्रेडिट दिले आहे.

Shriram Iyengar

नरेंद्र मोदींवर बनणाऱ्या जीवनपटाचे निर्माते संदीप सिंह यांनी जावेद अख्तर आणि समीर या गीतकारांची नावे ट्रेलरमध्ये दाखवल्याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.

"टी-सिरीज आमचे म्युजिक पार्टनर असल्याने आम्ही १९४७ अर्थ (१९९९) चित्रपटातून 'ईश्वर अल्लाह' आणि दस (१९९७) चित्रपटातून 'सुनो गौर से दुनियावालों' ही गाणी आमच्या चित्रपटात वापरली आहेत, म्हणून आम्ही जावेद साहेब आणि समीरजी यांची नावं चित्रपटाच्या क्रेडिट मध्ये लावली आहेत," संदीप सिंहांनी विधान केले.

जावेद अख्तर आणि समीर यांनी मोदींच्या जीवनपटासाठी कोणतेही गाणे न लिहल्याचे स्पष्ट केले होते.

'ईश्वर अल्लाह' हे गाणे ए आर रहमान यांनी संगीतबद्ध केले होते तर 'सुनो गौर से दुनियावालों' ला शंकर-एहसान-लॉय यांनी संगीत दिले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे संगीतकारांना मात्र ट्रेलर मध्ये क्रेडिट दिलेले नाही.

दोन्ही गाण्याचे हक्क टी-सिरीज कडेच आहेत. टी-सीरिजने या अगोदर सुद्धा काही लोकप्रिय जुन्या गाण्यांचे रीमेक आणि रिमिक्स व्हर्जन्स बनवले आहेत. लुका चुप्पी (२०१९) मधले 'पोस्टर लगवा दो', नोटबुक (२०१९) मधले 'बुमरो' आणि सिम्बा (२०१८) मधले 'आंख मारे' ही त्याचीच काही उदाहरणे.

परंतु ट्रेलरमध्ये ओरिजिनल गीतकारांना क्रेडिट देणे ही गोष्ट फार दुर्मिळ आहे.

पीएम नरेंद्र मोदी मधले पहिले ओरिजिनल गाणे 'सौगंध मुझे इस मिट्टी की' शनिवारी रिलीज करण्यात आले. प्रसून जोशी यांनी गाण्याचे शब्द लिहले असून सुखविंदर सिंह आणि शशी सुमन यांनी हे गाणे गायले आहे.

पीएम नरेंद्र मोदी ५ एप्रिल ला रिलीज होईल.

Related topics