{ Page-Title / Story-Title }

News Hindi

निर्माते संदीप सिंह पीएम नरेंद्र मोदी चित्रपटासाठी प्रथमच गाणे गाणार

Read in: English


त्यांनी गायलेले 'नमो नमो' हे गाणे नरेंद्र मोदीं साठी एक ट्रिब्यूट असेल.

Our Correspondent

निर्माते संदीप सिंह यांनी पीएम नरेंद्र मोदी चित्रपटामध्ये स्वतः गाणे गाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी गायलेले 'नमो नमो' हे गाणे मोदीं साठी एक ट्रिब्यूट असेल.

पेरी जी यांनी गाण्याचे शब्द लिहले असून ते गाण्यात रॅप सुद्धा करणार आहेत.

गाणे गाण्याच्या निर्णयाबाबत सिंह म्हणाले, "हा चित्रपट माझ्यासाठी जिव्हाळ्याचा विषय आहे म्हणून मी त्याला माझा एक वयक्तिक टच देण्याचा विचार केला. आपण सगळे ज्यांचा आदर करतो अशा व्यक्तीसाठी रॅप सॉंग गाणे या पेक्षा चांगली गोष्ट आणखी कोणती असू शकते? आशा आहे की लोकांना पण हे गाणे आवडेल.

पीएम नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्याच्या मतदानाच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच १२ एप्रिल ला, रिलीज होणार होता, परंतु आता तो ५ एप्रिल ला रिलीज होणार आहे.

चित्रपटाचे निर्माते ग्लोबल स्टुडिओज, टी-सिरीज आणि २ हिंदी वर्तमानपत्रांना निवडणूक आयोगाने आचारसंहिता चालू असताना लोकसभा उमेदवाराचा प्रचार केल्यासंबंधी नोटीस पाठवल्या.

गेल्या आठवड्यात दिग्गज गीतकार जावेद अख्तर आणि समीर अंजान यांनी चित्रपटाच्या क्रेडिट मध्ये त्यांचे नाव पाहून नाराजी व्यक्त केली होती. नाराजीचे कारण होते की त्या दोघांनीही चित्रपटासाठी कोणतेही गाणे लिहलेले नाही.

या बद्दल निर्माते संदीप सिंह यांनी स्पष्टीकरण दिले की दोघांनी लिहलेली जुनी गाणी चित्रपटात वापरल्यामुळे त्यांना क्रेडिट्स देण्यात आले आहे.

विवेक आनंद ओबेरॉय चित्रपटात मोदींची भूमिका करणार आहेत. त्यासाठी ते आपल्याला वेगवेगळ्या वेशात दिसतील.

Related topics