प्रनूतन बहल आणि झहीर इक्बाल यांनी साकारलेल्या पात्रां मधल्या अनोख्या लव्ह स्टोरी बद्दल हे गाणे आहे.
नोटबुक गाणे 'मैं तारे' – सलमान खान ने स्वतः हे गाणे गायले आहे
मुंबई - 21 Mar 2019 21:35 IST


Keyur Seta
नोटबुक चित्रपटातील 'मैं तारे' हे गाणे झहीर इक्बाल आणि प्रनूतन बहल यांच्या पात्रां मधल्या अनोख्या प्रेम कहाणी बद्दल आहे. ट्रेलर मध्ये सांगण्यात आले होते की ते एकमेकांना कधीही भेटले नसून सुद्धा एकमेकांच्या प्रेमात आहेत.
गाण्याचे भाव हे चित्रपटाच्या कथेशी तंतोतंत जुळतात. विशाल मिश्र चे संगीत साधे पण कर्णमधुर आहे. या गाण्यामध्ये हे गाणे कुठे घडते याचा उल्लेख आहे.
गीतकार मनोज मुंटाशीर यांनी आपल्या काव्यमय शब्दांतून नायकाचे प्रेम व्यक्त केले आहे. झहीर आपल्या प्रेयसीची भेट घेण्यास आतुर झाला आहे, हे या गाण्यातून सांगायचा प्रयत्न केला आहे.
सलमान खान ने सलमान खान फिल्म्स या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यांनीच हे गाणे गायले आहे. गाण्यात एकच निगेटिव्ह गोष्ट आहे ती म्हणजे सलमान खान गाण्यात खूप निरुत्साही दिसतात.
नोटबुक चे दिग्दर्शन नितीन कक्कर ने केले आहे. नितीन कक्कर यांनी या अगोदर फिल्मिस्तान (२०१४) आणि मित्रो (२०१८) यां सारखे समीक्षकांची वाहवा मिळवलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
नोटबुक २९ मार्च ला रिलीज होईल. गाणे खाली पहा.