{ Page-Title / Story-Title }

News Hindi

आलिया भट्ट आणि सलमान खान संजय लीला भन्साली च्या इन्शाल्लाह मध्ये एकत्र


आलिया भट्ट ने ट्विटरवरून या बातमीची पुष्टी केली. सोमवारी त्यांना संजय लीला भन्साली च्या ऑफिसमधून बाहेर येताना पहिले होते.

Our Correspondent

अभिनेत्री आलिया भट्ट ने चित्रपट साइन करण्याचा जणू तगादा लावला आहे. एस एस राजमौळींचा आर आर आर हा चित्रपट साइन केल्याची खबर ताजी असतानाच त्या आणखी एका मोठ्या चित्रपटात काम करणार असल्याची बातमी आली आहे.

त्यांनी ट्विटरवरून या बातमीची पुष्टी केली, "मी ९ वर्षाची होती जेव्हा मी संजय लीला भन्सालीच्या ऑफिसमध्ये पहिल्यांदा गेले. तेव्हापासून त्यांच्या चित्रपटात काम करण्याची इच्छापूर्ती आज झाली."

सलमान खान ने सुद्धा ट्विटरवरून आलिया चे चित्रपटाच्या टीम मध्ये स्वागत केले.

इन्शाल्लाह मध्ये संजय लीला भन्साली आणि सलमान खान २० वर्षांनी एकत्र काम करणार आहेत. या अगोदर त्यांनी हम दिल दे चुके सनम (१९९९) मध्ये एकत्र काम केले होते.

आलिया भट्ट सध्या काही मोठ्या चित्रपटांमध्ये व्यस्त आहेत. महिन्याच्या सुरुवातीला रणबीर कपूर आणि आलियाची प्रमुख भूमिका असलेल्या ब्रम्हास्त्र चा फर्स्ट लुक रिव्हिल करण्यात आला. १७ एप्रिल ला रिलीज होणाऱ्या कलंक मध्ये सुद्धा त्यांची प्रमुख भूमिका आहे.

भन्साली आणि सलमान खान एकत्र काम करणार असल्याची बातमी जून २०१८ मध्येच बाहेर आली होती, पण प्रोडक्शन टीम योग्य अभिनेत्रीच्या शोधात होते. सोमवारी संजय लीला भन्साली च्या ऑफिसच्या बाहेर आलिया भट्ट दिसल्या होत्या आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी ही घोषणा करण्यात आली.

सलमान खान सध्या भारत च्या रिलीज च्या प्रतीक्षेत आहेत. दबंग ३ आणि किक २ वर सुद्धा काम लवकरच सुरु होईल.

Related topics