News Marathi

सावट ट्रेलर – स्मिता तांबे एका गावात ७ वर्षात झालेले ७ संशयित मृत्यूच्या कारणांचा शोध घेत आहेत


सौरभ सिन्हा ने या थरारपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.

Keyur Seta

स्त्रियांची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटांच्या संख्येत वाढ होत आहे. पोलिसांच्या भूमिकेत महिला अधिकारी या विषयावर सुद्धा काही चित्रपट आले आहेत. मर्दानी (२०१४) आणि जय गंगाजल (२०१६) ही त्यातलीच काही उदाहरणे.

आता मराठी चित्रपटसृष्टी यात कशी मागे राहील? म्हणून मराठीत सुद्धा सावट (२०१९) मध्ये महिला पोलीस अधिकारी प्रमुख भूमिकेत दिसेल. चित्रपटात स्मिता तांबे पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहेत.

सौरभ सिन्हा लिखित आणि दिग्दर्शित सावट मध्ये एका गावात सात वर्षात सात आत्महत्या होतात. पण गावकऱ्यांना वाटते की या आत्महत्या नसून खून आहेत आणि त्यामागे अघोरी शक्तीचा हात आहे.

गावकरी स्मिता तांबेंचे पात्र म्हणजेच अदिती देशमुखला सांगतात की त्यांच्या गावातली एक मुलगी नंदिनी अघोरी शक्तीची पूजा करत असे त्यामुळे तिला गावातून हाकलले आणि या खुनाच्या मागे सुद्धा तीच आहे असा गावकऱ्यांचा अंदाज आहे. अदितीच्या नंतर लक्षात येते की हिंदू कॅलेंडरनुसार हे सर्व खून एकाच दिवशी होतात.

सावट चे कथानक इंटरेस्टिंग असून ट्रेलर पाहून तुमची उत्सुकता नक्कीच वाढते. काही सीन्स मध्ये ओवरऍक्टिंग केले हाच एका प्रॉब्लेम आहे.

तांबे इन्स्पेक्टरच्या रोल मध्ये शोभतात. त्यांनी अगदी सहज अभिनय केला आहे. पण ट्रेलरमध्ये इतर ऍक्टर्स ना काहीच वाव दिला नाही.

सावट सौरभ सिन्हाचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट आहे. त्यांनी या अगोदर काही शॉर्ट फिल्म्स चे लेखन-दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे. ट्रेलर खाली पहा.

Related topics

Trailer review