News Marathi

१५ ऑगस्ट ट्रेलर – माधुरी दीक्षितचा निर्माती म्हणून पहिला चित्रपट रोमांचक वाटतो

Read in: English


चित्रपटात मृन्मयी देशपांडे आणि राहुल पेठे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Keyur Seta

१५ ऑगस्ट हा माधुरी दीक्षितचा निर्माती म्हणून पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटाचे कथानक जरी १५ ऑगस्ट ला घडत असले तरी लव्ह स्टोरी हाच चित्रपटाचा विषय आहे.

मुंबईच्या गांधी चाळी मध्ये सर्वजण १५ ऑगस्ट च्या तयारीत आहेत. पण सुलभा (मृन्मयी देशपांडे) आणि राजू (राहुल पेठे) मात्र वेगळ्याच प्रॉब्लेम मध्ये आहेत. ते एकमेकांवर प्रेम करतात, पण सुलभाचे लग्न एका एन आर आय (आदिनाथ कोठारे) बरोबर ठरलेय.

सुलभा आणि राजू पळून जाऊन लग्न करायचं ठरवतात, परंतु राजूने आणलेली अंगठी एका छोट्या होल मध्ये पडते. चित्रपटाचा विषय तसा नवीन आहे. रोमान्स बरोबर चित्रपटात काही अंशी थरार देखील आहे. चाळ आणि त्यातली लोकं खरी वाटतात. चित्रपटात रेणुका शहाणे सुद्धा आहेत. माधुरी दीक्षितच्या अभिनेत्री म्हणून पहिलाच मराठी चित्रपट बकेट लिस्ट (२०१८) मध्ये सुद्धा त्या होत्या.

२९ मार्च ला १५ ऑगस्ट नेटफ्लिक्स वर रिलीज होईल. स्वप्ननील जयकर ने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. पण ट्रेलरमध्ये त्यांचे नाव कुठेच दाखवले नाही. ट्रेलर खाली पहा.

Related topics

Trailer review