{ Page-Title / Story-Title }

News Hindi

वासन बाला दिग्दर्शित मर्द को दर्द नही होता २१ मार्च ला रिलीज होईल


२०१८ टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचा प्रीमिअर झाला असून तिथे चित्रपटाने पीपल्स चॉईस अवॉर्ड सुद्धा मिळवला.

Our Correspondent

मामी २०१८ आणि टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१८ मध्ये समीक्षांची मने जिंकल्या नंतर आता शेवटी मर्द को दर्द नही होता मार्च महिन्यात सिनेमागृहांमध्ये रिलीज होईल.

२१ मार्च २०१९ या दिवशी हा चित्रपट रिलीज होणार आहे. गेल्या वर्षी पार पडलेल्या टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाने पीपल्स चॉईस अवॉर्ड मिळवला होता.

१४ वर्षे चित्रपटसृष्टीत काम केल्यानंतर दिग्दर्शक वासन बाला यांचा सिनेमागृहात रिलीज होणारा हा पहिलाच चित्रपट आहे. वासन बाला यांनी दिग्दर्शित केलेला पेडलर्स अजून रिलीजच्या प्रतीक्षेत आहे.

मर्द को दर्द नही होता चित्रपटात अभिमन्यु दासानी यांनी ज्याला वेदना होत नाहीत अश्या मार्शल आर्टिस्ट मुलाची भूमिका साकारली आहे. आपल्या आजोबांच्या छत्रछायेत वाढल्यानंतर शेवटी तो गुलशन देवैया यांनी साकारलेल्या जुळ्या भावंडांशी दोन हात करायला घेतो. त्यातला एक भाऊ गँगस्टर असतो तर दुसरा कराटे एक्सपर्ट.

मामी २०१८ महोत्सवाची सुरवात या चित्रपटाने झाली आणि तिथे त्याला प्रेक्षकांचे स्टँडिंग ओव्हेशन मिळाले.

Related topics