करण कुलकर्णी ने संगीतबद्ध केलेल्या या अल्बम मधले पहिले गाणे ऐकून तुम्हाला ही थिरकावेसे वाटेल.
मर्द को दर्द नही होता गाणे 'रप्पन रप्पी राप' मजेदार आणि विनोदी आहे
मुंबई - 16 Mar 2019 21:45 IST


Sonal Pandya
अगोदर आलेल्या 'बॉलिवूड'-स्टाइल ट्रेलर प्रमाणेच वासन बाला दिग्दर्शित मर्द को दर्द नही होता मधल्या पहिल्या गाण्यात सुद्धा पॉप कल्चर आणि इतर चित्रपटांचे रेफेरेंस आहेत.
चित्रपटातल्या महत्वाच्या पात्रांना घेऊन बनवलेल्या या गाण्यात चित्रपटाच्या कथानकाबद्दल काहीच खुलासा केलेला नाही. पण त्याने जास्त फरक पडत नाही कारण आपण करण कुलकर्णीच्या गाण्यात अगोदरच मंत्रमुग्ध झालेलो असतो.
गरिमा ओब्राह ने किती हॉलिवूड आणि 'बॉलिवूड' चित्रपटांची नावे या गाण्यात घेतली आहेत हे शोधण्यात आपण मग्न होतो. स्टार वॉर्स आणि निरमा यांचे रेफेरेंस सुद्धा या गाण्यात येऊन जातात.
बेन्नी दयाल चा आवाज या विचित्र शब्दरचना असलेल्या गाण्यासाठी निवडण्याचा निर्णय अगदी योग्य होता. अभिमन्यु दासानी आणि राधिका मदान या गाण्यात आपले फायटिंग कौशल्य दाखवण्या ऐवजी नृत्य कौशल्य दाखवत आहेत. खलनायक मणी (गुलशन देवैया) सुद्धा या गाण्यात आपले पाय थिरकवताना आपल्याला दिसतो.
कुलकर्णी आणि ओब्राह एकदम फॉर्म मध्ये आहेत. इतका वेगळा म्यूजिक अल्बम बनवण्यासाठी त्यांचे जेवढे कौतुक करू तेवढे थोडेच आहे. प्रत्येक गाणे चित्रपटाच्या सिच्युएशन ला चपखल बसेल असे बनवले आहे, इतर मुख्यप्रवाहातील चित्रपटांसारखा उगाचच आयटम सॉंग टाकण्यासारखा मूर्खपणा या चित्रपटात केलेला नाही.
पुन्हा पुन्हा ऐकायला आवडेल असे हे गाणे आहे. गेल्या वर्षी २०व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सुरुवात या चित्रपटानेच केली होती.
२१ मार्च ला हा चित्रपट रिलीज होईल. गाणे खाली पहा.