{ Page-Title / Story-Title }

News Hindi

कलंक मधील आलीया भट्ट चे नवीन पोस्टर तिच्या वाढदिवशी रिलीज केले


स्वातंत्र्यपूर्व काळात घडणाऱ्या या कथे मध्ये आलिया भट्ट रूप ही व्यक्तिरेखा साकारत आहेत.

Sonal Pandya

आज आलिया भट्ट च्या २६ व्या वाढदिवशी कलंक च्या निर्मात्यांनी आलिया साकारत असलेल्या व्यक्तिरेखाचे नवीन पोस्टर रिलीज केले.

करण जोहर ने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून आलिया चे पोस्टर रिलीज करताना लिहले, "धैर्य आणि धाडसाचे इतके सुंदर रूप तुम्ही कधी पहिले नसेल, भेटा धाडसी रूप ला."

चित्रपटाच्या टीजरमध्ये रूप, धवन चे पात्र जफर आणि आदित्य रॉय कपूर चे पात्र देव या तिघांच्या प्रेमाचा त्रिकोण दाखवला होता. दोन्ही अभिनेत्यांच्या व्यक्तिरेखांचे पोस्टर्स रिलीज झाले आहेत. रूप च्या पोस्टरमध्ये मात्र रामायणातील सीताहरण दाखवले आहे. आता हे पाहणे औत्सुक्याचे आहे की रामायणाच्या कथेचा या चित्रपटाशी काय संबंध आहे.

कलंक नंतर आलिया भट्ट रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चन बरोबर ब्रम्हास्त्र ट्रिलजी मध्ये काम करणार आहेत. कालच एस एस राजमौली दिग्दर्शित आर आर आर (२०२०) या आगामी चित्रपटात त्यांचे नाव घोषित करण्यात आले. अजय देवगण, रामचरण आणि ज्यू एन टी आर यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

झोया अख्तर दिग्दर्शित गली बॉय मधल्या अभिनया साठी सर्वांकडून प्रशंसा मिळवल्यानंतर आता पुढची दोन वर्षे त्या खूप व्यस्त असणार आहेत.

सोनाक्षी सिन्हा, माधुरी दीक्षित नेने आणि संजय दत्त यांच्या सुद्धा कलंक चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. १७ एप्रिल ला हा चित्रपट रिलीज होईल.

Related topics

Poster review