News Hindi

कलंक पोस्टर – बैलाची शिंगं पकडून त्याला अडवण्याच्या प्रयत्नात वरुण धवन जणू बाहुबलीच वाटतात


अभिषेक वर्मन दिग्दर्शित कलंक १७ एप्रिल ला रिलीज होणार.

Shriram Iyengar

अभिषेक वर्मन दिग्दर्शित कलंक मध्ये वरुण धवन ला जफर च्या भूमिकेत पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. गंभीर आणि उग्र स्वभावाच्या जफरचे पात्र वरुण ने आता पर्यंत निभावलेल्या हलक्याफुलक्या विनोदी हिरोंपेक्षा विपरीत आहे.

या नवीन पोस्टरमध्ये त्यांच्या पात्राचा ऍक्शन ने भरपूर अंदाज पाहायला मिळतो. 

पोस्टरमध्ये धवन बैलाला त्याची शिंगे पकडून थोपवून धरताना दिसतात. टीजरमध्ये सुद्धा हे दृश्य होते. हे दृश्य आपल्याला बाहुबली द बिगिनींग (२०१५) चित्रपटातील अशाच पद्धतीचे भल्लालदेव विरुद्ध बैलाच्या युद्धाची आठवण करून देते.

पण या दृश्यातून आपल्याला जफरच्या मनात धुमसत असलेला राग दिसतो. टीजर पाहून जफर आणि रूप वर खूप मोठा अन्याय झाला आहे असे वाटते. आणि हा उद्वेगच वर्मन दिग्दर्शित या चित्रपटाचा महत्वाचा भाग आहे.

कलंकमध्ये संजय दत्त, माधुरी दीक्षित नेने, आदित्य रॉय कपूर, सोनाक्षी सिन्हा आणि आलिया भट्ट यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.

१७ एप्रिल ला कलंक रिलीज होईल.

Related topics

Poster review