{ Page-Title / Story-Title }

News English (India)

डेल्ही क्राइम ट्रेलर – पोलिसांच्या नजरेतून निर्भया केसवर या सिरीजमध्ये प्रकाश टाकला आहे


या अँथॉलॉजी सिरीज चा पहिला सीजन २२ मार्च पासून नेटफ्लिक्स वर उपलब्ध होईल.

Sonal Pandya

"हा फक्त क्रूर अपराध नाही तर विकृतीचा कळस आहे." नेटफ्लिक्स च्या डेल्ही क्राइम सिरीज मध्ये डीसीपी वार्तिका चतुर्वेदीच्या तोंडी हा संवाद आहे.

अँथॉलॉजीचा पहिल्या ट्रेलर मध्ये आपल्याला दिल्ली पोलिसांनी कसे ७२ तासांमध्ये एका तरुणीचा गँगरेप करणाऱ्या आरोपींना शोधून काढले हे दाखवले आहे.

रिची मेहता दिग्दर्शित या शो मध्ये त्या घटने नंतर काय घटना घडल्या ते दाखवले आहे. शेफाली शहा आणि त्यांची टीम एकीकडे कुटुंबाचे सांत्वन करत आहेत तर दुसरीकडे आरोपींना पकडण्यासाठी त्यांचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. पुन्हा या घटनेचे पडसाद म्हणून सामान्य लोकांच्या उद्वेगाला सुद्धा सामोरे जावे लागत आहे.

या सिरीजमध्ये २०१२ चा काळ, जेव्हा लोकांचा पोलीस यंत्रणेवरचा विश्वास पूर्ण उडून गेला होता, दाखवला आहे. दिल्ली पोलिसांकडे असलेल्या केस फाइल्स वर आधारित ही सिरीज खऱ्या लोकेशन्सवर शूट केली आहे. पोलीसांच्या नजरेतून २०१२ च्या निर्भया केसवर या सिरीजमध्ये प्रकाश टाकला आहे.

या सिरीजमध्ये रसिका दुग्गल, राजेश तैलंग आदिल हुसेन आणि डेंझिल स्मिथ यांच्या सुद्धा भूमिका आहेत. या जानेवारीत संडान्स चित्रपट महोत्सवातील इंडी एपिसोडिक विभागात सिरींजचा प्रीमिअर झाला होता.

Related topics

Trailer review