News Hindi

गली बॉय नंतर रीमा कागती आणि झोया अख्तर हिप-हॉप वर पुन्हा एक चित्रपट बनवणार


हा गली बॉय चा सिक्वेल असेल की कोणा वेगळ्याच व्यक्तीची कहाणी असेल या सर्व गोष्टी मात्र झोयाने अजून गुलदस्त्यातच ठेवल्या आहेत.

Our Correspondent

गली बॉय च्या फॅन्स साठी खुशखबर आहे. असे वाटते झोया अख्तर आणि रीमा कागती यांचे हिप-हॉप वरचे मन अजून भरले नाही. गली बॉय च्या यशानंतर झोया ने खुलासा केला की रीमा आणि त्या स्वतः हिप-हॉपच्या विश्वा भोवती फिरणारा अजून एक चित्रपट लिहत आहेत.

डेक्कन क्रोनिकल या दैनिकाशी बोलताना झोया म्हणाल्या, "माझ्या सह-लेखिका कागती आणि मला असे वाटते की आपल्या देशातल्या वाढत्या हिप-हॉप कल्चर बद्दल अजून खूप काही सांगण्या सारखे आहे, आणि याच विषयावर अजून एक चित्रपट आम्ही लिहत आहोत."

हा गली बॉय चा सिक्वेल असेल की कोणा वेगळ्याच व्यक्तीची कहाणी असेल या सर्व गोष्टी मात्र झोयाने अजून गुलदस्त्यातच ठेवल्या आहेत.

व्हॅलेंटाइन डे ला रिलीज झालेल्या गली बॉय मध्ये गरीब घरातून आलेल्या मुराद ची प्रसिद्ध गायक होण्यापर्यंतचा प्रवास दाखवला आहे.

रु१०० कोटीचा टप्पा पार करणारा हा झोयाचा पहिलाच चित्रपट आहे. दिग्दर्शक म्हणून हा त्यांचा चौथा चित्रपट आहे. त्यांनी दोन लघुपट सुद्धा दिग्दर्शित केले आहे. बॉम्बे टॉकीज (२०१३) आणि लस्ट स्टोरीज (२०१८) या अँथॉलॉजी चित्रपटांमध्ये हे दोन लघुपट दाखवले आहेत.

गली बॉय नंतर झोया आणि कागतीने मेड इन हेवन या वेब-सिरीज ची निर्मिती केली आहे. ८ मार्च पासून ऍमेझॉन प्राइमवर ही सिरीज दाखवली जात आहे. 

Related topics