{ Page-Title / Story-Title }

News Hindi

कलंक टीजर लॉंच – जेव्हा आलिया वरुण धवनवर नाराज होत्या


धवन सेट्सवर उशिरा पोचल्यामुळे आलिया भट्ट ने त्याच्याशी अबोला धरला.

फोटो - शटरबग्स इमेजस

Mayur Lookhar

एके काळी प्रियकर प्रेयसी समजले जाणारे आलिया भट्ट आणि वरुण धवन आता सुद्धा एकत्र काम करत आहेत. १७ एप्रिल ला रिलीज होणाऱ्या धर्मा प्रोडक्शन्स निर्मित कलंक चित्रपटात ते पुन्हा एकत्र काम करत आहेत.

त्यांच्या रियुनियन ची सुरुवात मात्र वरुणच्या मना सारखी झाली नाही. धवन ला भट्ट च्या वागणुकीत वेगळेपणा जाणवला. १२ मार्च ला कलंक च्या टीजर लॉन्च च्या वेळी वरुण ने हा खुलासा केला.

शूटिंगच्या सुरुवातीच्या काळात एक दिवस धवन २० मिनिटे उशिरा आले आणि त्यामुळे नाराज होऊन आलिया त्याचाशी बोलली नाही.

"मी २० मिनटे सेटवर उशिरा आलो त्यामुळे ती नाराज झाली. मी तिची क्षमा मागितली तरी तिने तिचा अबोला सोडला नाही. मला वाटले तिने दोन-तीन हिट चित्रपट काय दिले तर आता तिला खूप ऍटिट्यूड आलाय. मी तिला विचारले पण की ती इतका ऍटिट्यूड का दाखवते, तर ती म्हणाली की मी माझ्या कॅरेक्टरमध्ये आहे."

धवन ने सांगितले की शेवटी एका ऍक्सिडेंटमुळे त्यांचा अबोला तुटला.

त्या ऍक्सिडेंट विषयी बोलताना धवन म्हणाले, "तिला एका सीन मध्ये काही सामान घेऊन चालायचे होते आणि मला ठाऊक होते ती नक्कीच तोल जाऊन पडणार आणि मी तिला पाडण्या अगोदरच सावरले. अभिषेक ला हा सीन आवडला नाही पण यामुळे आम्ही पुन्हा एकमेकांशी बोलायला लागलो."

अभिषेक वर्मन चे सर्व कलाकारांनी तोंड भरून कौतुक केले. ते उत्तम दिग्दर्शकच नव्हे तर एक चांगले व्यक्ती आहेत. आलिया म्हणाल्या त्यांची इच्छा आहे की हा चित्रपट वर्मन साठी तरी यशस्वी व्हायला हवा.

अभिषेक वर्मन ची स्तुती करताना धवन ने जुना किस्सा सांगितला. माय नेम इज खान (२०१०) शूटिंगच्या वेळी वरुण नि अभिषेक करण जोहर चे असिस्टंट म्हणून काम करत होते. "आम्ही एकाच रूम मध्ये राहायचो. त्यावेळी मला कंटाळा येत असे म्हणून तो माझ्या कपड्यांची इस्त्री करून ठेवत असे. मी टापटीप राहायला हवं असं तो मला नेहमी सांगत असायचा," वरुण म्हणाले.

"मला त्याच्या बरोबर काम करायला आवडते. या चित्रपटात सुद्धा त्याचा अभिनय खूप छान झाला आहे," आलीया धवनबद्दल म्हणाल्या. नंतर वरूण ने आलिया ला आपल्या हातात उचलून घेऊन काही फोटो काढले.

त्या दोघांनीही करण जोहर दिग्दर्शित स्टुडन्ट ऑफ द इयर (२०१२) चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. धवन आणि आलिया ने आता पर्यंत धर्मा प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या हम्प्टी शर्मा की दुल्हनिया (२०१४), बद्रीनाथ की दुल्हनिया (२०१७) आणि आता कलंक या तीन चित्रपटात एकत्र काम केले आहे.

Related topics