News Hindi

कलंक टीजर – या स्वातंत्र्य पूर्व काळातील कथानकात वरुण आणि आलीया यांची नजर एकमेकांवरच


अभिषेक वर्मन च्या या चित्रपटाच्या फर्स्ट लूक मध्ये सर्व पात्रांची ओळख करून दिलेली आहे.

Sonal Pandya

कुछ रिश्ते कर्ज की तरह होते हैं, इन्हें निभाना नहीं चुकाना पड़ता है, अभिषेक वर्मन दिग्दर्शित कलंक च्या फर्स्ट टीजर मध्ये आपल्याला हे वाक्य जफर च्या तोंडी ऐकु येते.

संजय दत्त पुरुषप्रधान कुटुंबाच्या प्रमुखाची भूमिका साकारत आहेत. माधुरी दीक्षित नेने अलिप्त राहणाऱ्या बहार बेगम तर आलिया भट्ट जफर च्या प्रेमात वेडी असलेल्या रूप चे भूमिका साकारत आहेत.

आदित्य रॉय कपूर देव चौधरी च्या भूमिकेत आणि सोनाक्षी सिन्हा सत्या चौधरी च्या भूमिकेत दिसणार आहेत. धाडसी आणि लढवय्या वृत्तीचा जफर मात्र बाहेरून आला आहे.

धर्मा च्या इतर चित्रपटांपेक्षाही हा चित्रपट अधिक भव्य दिसत आहे. भव्यदिव्य सेट्स आणि आकर्षक कॉश्च्युम मुळे कलंक आपली उत्सुकता जागवण्यात यशस्वी झालाय.

जब किसी और की बर्बादी अपनी जीत जैसी लगे तो हमसे ज्यादा बर्बाद कोई नहीं इस दुनिया में, वेद शी लग्न करताना रूप च्या आवाजात आपल्याला हे व्हॉईसओव्हर ऐकू येते. ती दुसऱ्याच्याच प्रेमात आहे.

टीजर चा दुःखी टोन पाहून असे वाटते की यातली बहुतेक पात्रांच्या वाट्याला हॅप्पी एंडिंग येणार नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात घडणारी ही अजरामर प्रेमाची कथा आहे.

करण जोहर आणि साजिद नाडियाडवाला यांची सह-निर्मिती असलेला कलंक १७ एप्रिल २०१९ ला रिलीज होईल. पहिला टीजर खाली पहा.

Related topics

Teaser review