News Marathi

सैराट फेम रिंकू राजगुरु कागर या आपल्या पुढील चित्रपटात एका राजकारणीची भूमिका साकारत आहेत?


चित्रपटाच्या कथे बद्दल काहीच कल्पना नसली तरी सोशल मीडियावर नुकत्याच रिलीज झालेल्या चित्रपटाच्या पोस्टर वरून रिंकू राजगुरू च्या पात्रा विषयी थोडी कल्पना येते.

Our Correspondent

सुपरहिट सैराट (२०१६) नंतर रिंकू राजगुरूच्या पुढील चित्रपटासाठी तिच्या चाहत्यांना खूप वेळ वाट पाहावी लागली. मकरंद माने दिग्दर्शित कागर ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. आधी हा चित्रपट १४ फेब्रुवारी ला रिलीज होणार होता, परंतु रिंकू राजगुरूची १२वीची बोर्डाची परीक्षा असल्याने निर्मात्यांनी रिलीज डेट पुढे ढकलली.

चित्रपटाच्या कथे बद्दल काहीच कल्पना नसली तरी सोशल मीडियावर नुकत्याच रिलीज झालेल्या चित्रपटाच्या पोस्टर वरून रिंकू राजगुरूच्या पात्राविषयी थोडी कल्पना येते. त्या एक राजकीय व्यक्तिमत्व आहेत असे वाटते. फार क्वचितच रिंकू इतके तरुण कलाकार कोण्या राजकीय व्यक्तिमत्वाची भूमिका साकारताना आपण पाहिलंय.

रिंकू राजगुरु खूप सुंदर दिसत आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविशास झळकत आहे. फक्त त्यांच्या देहबोलीतूनच आपल्याला त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज येतो. पोस्टरच्या बॅकग्राऊंड मध्ये आपल्याला तिचा फोटो असलेले होर्डिंग्स घेऊन तिचे समर्थक दिसत आहेत.

गेल्या वर्षी रिंकू या चित्रपटासाठी एक गाणे शूट करतानाचा विडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला होता. चित्रपटातील इतर कलाकारांची नावे अजून घोषित केलेली नाहीत.

मकरंद माने ने समीक्षकांची वाहवा मिळवणाऱ्या रिंगण (२०१७) या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले होते. चित्रपटात शशांक शेंडे आणि साहिल जोशी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्यानंतर त्यांनी यंग्राड (२०१८) हा चित्रपट दिग्दर्शित केला.

Related topics

Poster review