News Hindi

स्क्रिप्ट च्या चोरी विरुद्ध लढण्यासाठी स्क्रीनरायटर्स असोशिएशन लेखकांना कायदेशीर मदत पुरवणार


स्क्रीनरायटर्स असोशिएशन काही वकिलांचा मिळून एक पॅनल तयार करणार आहेत जे नंतर सवलतीच्या फी मध्ये लेखकांच्या केस लढतील.

अंजुम राजबली, कमलेश पांडे

Mayur Lookhar

आता लवकरच स्क्रिनरायटर्स असोशिएशन लेखकांना त्यांच्या स्क्रिप्टच्या चोरी विरुद्ध लढण्यासाठी कायदेशीर मदत करणार आहे.

आम्ही एक कायदेशीर मदत निधी (लीगल एड फंड) निर्मिती करणार आहोत जो सर्व लेखकांच्या मदतीला उपलब्ध असेल. गरज असल्यास आम्ही ५०% पेक्षा जास्त निधी सुद्धा या कामासाठी लावू. स्क्रीनरायटर आणि स्क्रीनरायटर्स असोशिएशन चे कार्यकारी समितीचे मेम्बर अंजुम राजाबली यांनी हे विधान केले.

रॉबिन भट्ट यांच्या अध्यक्षते खाली स्क्रिनरायटर्स असोशिएशन मध्ये सध्या २५,००० सदस्य आहेत. स्क्रीनरायटर्स असोशिएशन काही वकिलांचा मिळून एक पॅनल तयार करणार आहेत जे नंतर सवलतीच्या फीमध्ये लेखकांचे केस लढतील.

"आमच्याकडे कॉपीराईट लॉ चे अभ्यासक उपलब्ध आहेत, सर्वात अगोदर आम्ही त्यांच्याकडे लेखकांची केस घेऊन जाणार हे पाहायला की कायदेशीर करणे आवश्यक आहे का नाही," राजबली म्हणाले. त्यानंतर ही केस तंटा मुक्तीकरण विभागाकडे [डिस्प्युट सेटलमेंट कमिटी] पाठवण्यात येईल."

"इंडस्ट्रीने सुद्धा काळजी घेतली पाहिजे की त्यांच्याकडे येणारी स्क्रिप्ट चोरीची किंवा कॉपी तर नाही ना," राजबली म्हणाले.

दिग्गज पटकथालेखक कमलेश पांडे, ज्यांनी चालबाज (१९८९) आणि रंग दे बसंती (२००६) सारखे चित्रपट लिहले, आमच्याशी बोलताना म्हणाले, "अगदी सुरुवातीपासून आमचा हा अजेंडा होता. जेव्हा मी काही वर्षां पूर्वी स्क्रिनरायटर्स असोशिएशन चा जनरल सेक्रेटरी होतो तेव्हा आमच्या या विषयावर खूप चर्चा होत असत. त्यावेळी स्क्रिनरायटर्स असोशिएशन एफ डब्ल्यू आय सी ई [फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉयीज] शी सलंग्न होते. पण तिथे आमच्या तक्रारींची दखल घेतली जात नव्हती, आमच्याकडे १६ वर्ष जुन्या तक्रारी तशाच पडून होत्या पण आम्ही काहीच करू शकत नव्हतो."

पांडेंच्या मते सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता एफ डब्ल्यू आय सी ई चा लेखकां कडे पाहण्याचा दृष्टीकोण. त्यामुळे अशी चोरी करणाऱ्या निर्मात्यांवर कोणतीच कारवाई केली जात नव्हती.

एफ डब्ल्यू आय सी ई ज्युनियर आर्टिस्ट आणि दिवसाच्या भत्त्यावर काम करण्याऱ्या कामगारांचे प्रश्न सोडवत. "एफ डब्ल्यू आय सी ई एखाद्या निर्मात्या विरुद्ध असहयोगाची नोटीस पाठवून त्यांचे शूटिंग थांबवू शकत होते. पण आम्हा लेखकांच्या बाबतीत असे होणे कठीण आहे कारण शूटिंग सुरु होण्या अगोदरच आमचे काम पूर्ण झालेले असते. शेवटी गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये स्क्रिनरायटर्स असोशिएशन चे इलेक्शन झाल्यानंतर आम्ही एफ डब्ल्यू आय सी ई पासून वेगळे व्हायचे ठरवले," पांडे म्हणाले.

पांडे म्हणाले सर्व लेखकांना या स्क्रिप्ट चोरीचा सामना करावा लागतो. त्यांनी जन्नत २ च्या स्क्रिप्ट चोरीची फेमस केसची आठवण करून दिली. त्यावेळी महेश भट्ट ना कपिल चोपडा नावाच्या नवोदित लेखकाची स्क्रिप्ट चोरल्या बद्दल ३० लाख रुपयांची भरपाई करावी लागली.

"कपिल चोपडा आमच्याकडे तेव्हा आले होते. त्यांच्याकडे सर्व कागदपत्रे होती म्हणून आम्ही त्यांना कायदेशीर मार्गाने जाण्याचा सल्ला दिला. मुंबई उच्च न्यालयाच्या १० लाख रुपये भरपायी देण्याच्या निकालाविरुद्ध महेश भट्ट सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टाने त्यांना ३० लाख रुपये भरपाई देण्यास सांगितले. आता यापुढे जर कोणा लेखकाची फसवणूक केली तर आम्ही सुप्रीम कोर्टात देखील जाण्यास तयार आहोत.

पांडेंना आशा आहे की स्क्रिनरायटर्स असोशिएशन भविष्यात अमेरिकेतल्या रायटर्स गिल्ड ऑफ अमेरिका इतकीच महत्वपूर्ण आणि शक्तिशाली संस्था बनेल. "तुम्हाला आठवतच असेल काही वर्षांपूर्वी रायटर्स गिल्ड ऑफ अमेरिका ने हॉलिवूड ला लढा दिला होता. सहा महिन्यांसाठी टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्री ठप्प झाली होती. शेवटी कोर्टाने डब्ल्यू जी ए च्या बाजूने निकाल दिला. आता ती एक शक्तिशाली संस्था आहे. त्यांचे स्वतःचे ऑफिस आहे, वकिलांचा ताफा आहे. माझी आशा आहे की भविष्यात स्क्रिनरायटर्स असोशिएशन सुद्धा रायटर्स गिल्ड ऑफ अमेरिका इतकेच शक्तिशाली बनेल."

Related topics