News Marathi

तुझीच रे ट्रेलर – धर्मभेदावर आधारित अजून एक लव्ह स्टोरी


चित्रपटात नवोदित अभिनेता अक्षय कांबळी आणि प्रियांका यादव मुख्य भूमिकेत दिसतील.

Keyur Seta

दोन भिन्न जातींच्या मुला मुलींमध्ये होणारे प्रेम या विषयावर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सैराट (२०१६), यंटम (२०१८), बबन (२०१८) सारखे चित्रपट आले आहेत. लग्न मुबारक (२०१८) आणि परफ्युम (२०१९) या सारखे हिंदू-मुस्लिम लव्ह स्टोरी असलेले चित्रपटसुद्धा मराठीत आले आहेत.

प्रवीण राजा कराळे दिग्दर्शित तुझीच रे मध्ये हिंदू मुलगी शालू (प्रियांका यादव) आणि कॅथलिक मुलगा पीटर (अक्षय कांबळी) यांची लव्ह स्टोरी पाहायला मिळेल. मराठी चित्रपसृष्टीमध्ये हल्ली जातीभेद आणि धर्मभेद या विषयांवर अनेक चित्रपट बनत आहेत.

या विषयावर बनलेला हा पहिलाच चित्रपट असला असता तरी ट्रेलर ने तुमची निराशाच केली असती. ट्रेलरमध्ये आपल्याला फक्त ओव्हरऍक्टींग आणि कर्णकर्कश पार्श्वसंगीत आणि मध्येच येणारी गाणी पाहायला मिळतात.

नवोदित अभिनेता अक्षय कांबळी यांनी अभिनय आणि नृत्य या दोन्ही कलांमध्ये आपली प्रतिभा दाखवली आहे, परंतु प्रियांका यादव, ज्यांनी या अगोदर काही चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे, त्यांनी मात्र या ट्रेलरमध्ये सपशेल निराशा केली.

अशोक सराफ, अनिकेत विश्वासराव आणि प्रियांका यादव मुख्य भूमिकेत असलेल्या ह्रिदयात समथिंग समथिंग (२०१८) नंतर तुझीच रे हा कराळेचा दिग्दर्शक म्हणून दुसरा चित्रपट आहे. खाली ट्रेलर पहा.

Related topics

Trailer review