{ Page-Title / Story-Title }

News Marathi

अभय महाजन, गिरीश कुलकर्णी यांची मुख्य भूमिका असलेला त्रिज्या शांघाई चित्रपट महोत्सवात दाखवला


प्रथमच दिग्दर्शन करणारे अक्षय इंदीकर यांचा हा चित्रपट चित्राक्षी निर्मिती आणि बॉम्बे बर्लिन फिल्म प्रोडक्शन्स यांनी मिळून बनवला आहे.

Our Correspondent

दिग्दर्शक अक्षय इंदीकर यांचा चित्रपट त्रिज्या नुकताच शांघाई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आला. भारताकडून अधिकृत एंट्री म्हणून पाठवण्यात आलेल्या या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट दिग्दर्शक आणि उत्कृष्ट छायाचित्रण या तीन विभागांमध्ये नामांकन मिळाले होते. सोमवारीच या महोत्सवाची सांगता झाली.

चित्राक्षी निर्मिती आणि बॉम्बे बर्लिन फिल्म प्रोडक्शन्स यांनी मिळून हा चित्रपट बनवला आहे. बॉम्बे बर्लिन फिल्म्स हे इंडो-जर्मन प्रोडक्शन हाऊस कॅथरीन सॉकेल आणि आर्फि लांबा, ज्यांनी प्राग (२०१३) चित्रपटात काम केले आहे, या दोघांनी मिळून सुरु केले आहे.

शांघाई चित्रपट महोत्सवात अक्षय इंदीकर

"अक्षय ने हुशार चित्रपट बनवला असून नावाजलेल्या चित्रपट महोत्सवात या चित्रपटाची निवड होणे ही अक्षयसाठी नक्कीच खूप मोठी बाब असेल. आम्ही जेव्हा चित्रपटाची निर्मिती करायचे ठरवले तेव्हापासूनच आम्हाला अक्षयच्या प्रतिभेवर विश्वास होता. आम्हाला ठाऊक होते की तो एक चांगली कलाकृती बनवेल जी जगभरातल्या सर्व तरुण प्रेक्षकांना आवडेल," असं चित्रपटाचे निर्माते आर्फि लांबा यांनी म्हटले.

चित्रपटाविषयी बोलताना लांबा म्हणले, "हा चित्रपट जणू त्याची आत्मकथाच आहे. त्रिज्या मुळे भारतीय चित्रपटसृष्टीचे जगभरात नाव होईल असे मला वाटते." अभय महाजन, श्रीकांत यादव, गिरीश कुलकर्णी आणि गजानन परांजपे यांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.

सुधांशु सारिया यांचा लोएव (२०१८) आणि मिड झ यांचा रोड टू मंडाले (२०१६) या नंतर त्रिज्या ही लांबांची तिसरी निर्मिती आहे. निर्माते हा चित्रपट संपूर्ण भारतभर रिलीज करणार आहेत.

Related topics

Shanghai International Film Festival