{ Page-Title / Story-Title }

News Hindi

खास – दलीप ताहिल मिशन मंगल मध्ये खलनायकाच्या भूमिकेत


जगन शक्ती दिग्दर्शित मिशन मंगल इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनाइझेशन (इस्रो) च्या यशस्वी मंगळस्वारी वर आधारित आहे.

Keyur Seta

मिशन मंगलमध्ये दलीप ताहिल आणि अक्षय कुमार २५ वर्षांनी एकत्र काम करताना दिसतील. या अगोदर त्यांनी सुहाग (१९९४) मध्ये एकत्र काम केले होते. त्या चित्रपटात अजय देवगण, करिष्मा कपूर आणि नगमा यांच्या सुद्धा प्रमुख भूमिका होत्या.

जगन शक्ती दिग्दर्शित मिशन मंगल इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनाइझेशन (इस्रो) च्या यशस्वी मंगळस्वारीवर आधारित आहे.

सिनेस्तानला दिलेल्या मुलाखतीत ताहिल म्हणाले, "अक्षय सोबत काम करताना नेहमीच मज्जा येते, इतक्या वर्षा नंतर सुद्धा त्यांच्यात काहीच बदल झाला नाही. ते अजूनही आपले जीवन तितक्याच शिस्तबद्ध पद्धतीने जगतात.

जेव्हा अक्षय चित्रपटसृष्टीत नवखे होते तेव्हा सुद्धा ते सर्व गोष्टी वेळेनुसार करत असत आणि आता संपूर्ण प्रोडक्शन त्यांच्या ताब्यात असते त्यामुळे सर्वजण अगदी वेळेवर येतात कारण अक्षय स्वतः एक तास अगोदर सेटवर हजर असतात.

"अक्षय सकाळी ४ ला उठतात म्हणून मी त्यांना एकदा मस्करीत सांगितले की आम्हाला तुम्ही सकाळी सहा वाजता सेट वर बोलवू नका म्हणजे झालं."

त्यांच्या भूमिके विषयी विचारले असता ताहिल म्हणाले, "मी खलनायकाची भूमिका साकारतोय एवढंच मी सध्यातरी सांगू शकतो."

दलीप ताहिल यांनी मिशन मंगल ची स्तुती करताना म्हटले, "चित्रपटाचे कथानक उत्कृष्ट आहे. हा खूप वेगळा चित्रपट आहे. आजच्या पिढीवर या चित्रपटाचा खूप प्रभाव पडेल. भारताने अंतराळामध्ये केलेली प्रगती हा या चित्रपटाचा विषय आहे. ही अतिशय साधी आणि सोपी गोष्ट आहे."

मिशन मंगल १५ ऑगस्ट ला रिलीज होईल. याच दिवशी प्रभास यांचा साहो (२०१९) आणि जॉन एब्रहॅम यांचा बाटला हाऊस (२०१९) सुद्धा रिलीज होणार आहेत.

Related topics