News Marathi

स्माईल प्लीज मध्ये मुक्ता रहस्यमयी स्त्रीच्या भूमिकेत – टीजर पहा

Read in: English


विक्रम फडणीस दिग्दर्शित या चित्रपटात ललित प्रभाकर आणि प्रसाद ओक महत्वाच्या भूमिकेत आहेत.

Keyur Seta

फॅशन डिझायनर आणि दिग्दर्शक विक्रम फडणीस यांचा स्माईल प्लीज चित्रपटाचे पहिले पोस्टर पाहता आपल्याला असे वाटले होते की हा एक हलकाफुलका चित्रपट असेल. पण नुकताच रिलीज झालेला टीजर पाहता असे लक्षात येते की हा एक सायकोलॉजिकल ड्रामा असेल.

एवरेस्ट एन्टरटेनमेन्ट निर्मित स्माईल प्लीज मध्ये मुक्ता बर्वे, ललित प्रभाकर आणि प्रसाद ओक महत्वाच्या भूमिकेत आहेत.

टीजरवरून चित्रपटाच्या कथानकाचा अंदाज येत नाही. मुक्त बर्वे मनोवैज्ञानिक डॉक्टर समोर पुन्हा पुन्हा एकच वाक्य बोलताना दिसतात. त्यांना कदाचित काही मानसिक आजार आहे.

बर्वे आणि प्रभाकर यांच्या पात्रांमध्ये चांगले मैत्रीचे संबंध आहेत असं टीजर पाहून वाटते. अगदी काही क्षणांसाठी आपल्याला प्रसाद ओक यांची झलक दिसते.

परंतु टीजर नंतर आपला टोन बदलतो आणि सर्व पात्रे आनंदी आहेत दिसतात.

फडणीस यांचा दिग्दर्शक म्हणून हा दुसरा चित्रपट आहे. या अगोदर त्यांनी मुक्ता बर्वे आणि सुबोध भावे यांची प्रमुख भूमिका असलेला हृदयांतर (२०१७) चे दिग्दर्शन केले होते. हृदयांतर मध्ये ह्रितिक रोशन पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत होते.

स्माईल प्लीज १९ जुलै ला रिलीज होईल. खाली टीजर पहा आणि तुम्ही चित्रपट पाहण्यास उत्सुक आहात का ते आम्हाला कळवा.

Related topics

Teaser review