News Marathi

वन्स मोर ट्रेलर – एकाच वेळी दोन काळांमध्ये घडणाऱ्या समांतर कथा प्रभाव पाडू शकल्या नाहीत

Read in: English


चित्रपटात अनुभवी अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी ह्यांचे एक वेगळे अविश्वसनीय रूप पाहायला मिळते.

Keyur Seta

दिग्दर्शक नरेश बिडकर यांचा चित्रपट वन्स मोर (२०१९) मध्ये रोहिणी हट्टंगडी एका पुरुषाची भूमिका साकारत आहेत आणि याच साठी हा चित्रपट चर्चेत आला होता. पण ट्रेलरमध्ये मात्र त्यांच्या वाट्याला फारच कमी फुटेज आले आहे.

चित्रपटाचे कथानक दोन वेगवेगळ्या काळांमध्ये घडते. एक म्हणजे वर्तमानकाळ आणि दुसरा ३५० वर्षांपूर्वीचा काळ. ट्रेलरचा बहुतेक भाग पती-पत्नीच्या (आशुतोष पत्की आणि धनश्री दळवी यांच्या) भांडणावरच खर्च झाला आहे. त्यांचे भांडण देखील अगदी बालिश वाटते.

पती पुरातत्व विभागात काम करतो असं ट्रेलर पाहून तरी वाटते. तो आणि त्याची टीम समुद्रातून एक अत्यंत जुनी पेटी शोधून काढतात ज्यात एक जुनी कट्यार असते. त्याला खात्री आहे की त्यांनी एका जुन्या राजवटीचा शोध लावला आहे.

एक दिवस पती-पत्नीचं भांडण होत असताना पत्नी ती कट्यार पतीच्या दिशेने रागाने फेकून मारते. इथे आपल्याला समजते की हे दोघे पती-पत्नी मागच्या जन्मात एकमेकांचे शत्रू होते आणि त्यांच्यात युद्ध देखील झाले होते. इथे प्रेक्षकांना दाखवण्यात येते की ९०% पती-पत्नी मागच्या जन्मात एकमेकांचे अजात शत्रू असतात.

वाईट वी एफ एक्स आणि खालच्या दर्जाचे प्रोडक्शन ही देखील या चित्रपटातील आणखी एक चिंतेची बाब आहे. रोहिणी हट्टंगडी ह्यांचा पुरुषाचा लुक आणि त्यासाठी घेण्यात आलेली मेहनत ही या चित्रपटातील एकमेव चांगली गोष्ट आहे.

पण जर त्या दोन्ही पती-पत्नीचे लिंग पुढच्या जन्मातही बदलत नसेल तर रोहिणी हट्टंगडींच्या व्यक्तिरेखेचे लिंग बदलण्याची काय गरज होती असा प्रश्न पडतो.

वन्स मोर १ ऑगस्ट ला रिलीज होईल. खाली ट्रेलर पहा.

Related topics

Trailer review