{ Page-Title / Story-Title }

News Hindi

मी आता बरा झालो असलो तरी उपचार चालू आहेत, ऋषी कपूर यांनी कॅन्सरला लढा दिल्यावर मनोगत व्यक्त केले


पहिल्यांदाच ऋषी कपूर यांनी आपल्या आजारा विषयी सांगितले.

फोटो - शटरबग्स इमेजेस

Our Correspondent

इरफान खान, सोनाली बेंद्रे नंतर आता ऋषी कपूर यांनी सुद्धा कँसर सारख्या भयानक आजारावर मात केली. २०१८ पासून न्यू यॉर्क मध्ये ते कॅन्सरवर उपचार घेत होते, पण आता पर्यंत कपूर आणि त्यांच्या कुटुंबाने उपचारांबद्दल माहिती गुप्त ठेवली होती.

ऋषी कपूर यांनी पहिल्यांदाच यावर आपले मनोगत व्यक्त केले. मुंबई मिरर वृत्तपत्राशी बोलताना त्यांनी सर्वांचे आभार मानले, "माझे कुटुंबीय, मित्र आणि चाहतावर्ग या सर्वांच्या प्रार्थनेमुळे मी आता पूर्ण बरा झालो आहे. शरीरातून कँसर नष्ट झाला असला तरी उपचार चालू आहेत."

त्यांनी उपचारा विषयी अधिक माहित दिली, "उपचारां पेक्षा दोन ट्रीटमेंट मध्ये जो सहा आठवड्यांचा वेळ असतो तो अधिक त्रास देतो. या सहा आठवड्यांत तुम्ही अगदी नेहमीप्रमाणेच जीवन जगता. जेवणे, चित्रपट पाहणे, शॉपिंग करणे या सारख्या दैनंदिन गोष्टी तुम्ही करत असता, त्यामुळे या सर्व गोष्टी मी न्यू यॉर्क पेक्षा माझ्या घरी करणे पसंत केल्या असत्या."

गेल्या वर्षी नेटफ्लिक्स वर रिलीज झालेला लीना यादव दिग्दर्शित राजमा चावल हा ऋषी कपूर यांचा शेवटचा चित्रपट होता. त्याच बरोबर गेल्या वर्षी ऋषी कपूर यांनी मुल्क (२०१८), १०२ नॉट आऊट (२०१८) मध्ये प्रमुख भूमिका साकारल्या होत्या आणि मंटो (२०१८) मध्ये सुद्धा ते पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसले होते.

ऋषी कपूर यांनी सांगितले की जवळजवळ अकरा महिन्यांपासून त्यांचे न्यू यॉर्क मध्ये उपचार चालू होते आणि यावर्षी ऑगस्टमध्ये ते भारतात परततील.

"माझ्यासाठी हा खूप कठीण काळ होता पण नीतू (पत्नी), माझी दोन्ही मुलं (रणबीर आणि रिद्धिमा) हे माझे आधारस्तंभ होते. मी पाच-सहा आठवड्यांमध्ये भारतात परतेन. या दरम्यान माझ्यावर किमोथेरपी केली जाईल जेणेकरून कँसर पुन्हा निर्माण होऊ नये," असं ते म्हणाले.

Related topics