{ Page-Title / Story-Title }

News Marathi

आणि काय हवं?... ट्रेलर – जीवनातील साध्या गोष्टींमध्ये आनंद शोधणारी प्रिया आणि उमेशची जोडी


प्रिया बापट आणि उमेश कामत टाईम प्लीज (२०१३) नंतर सहा वर्षांनी पुन्हा एकत्र काम करताहेत.

Keyur Seta

प्रिया बापट आणि उमेश कामत ह्यांनी सहा वर्षां पूर्वी समीर विद्वंस दिग्दर्शित टाईम प्लीज (२०१३) मध्ये काम केले होते, त्यानंतर मात्र हा योग पुन्हा जुळून आला नाही. त्यांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या प्रेक्षकांची प्रतिक्षा मंगळवारी संपली.

प्रिया आणि उमेश ही जोडी आणि काय हवं?... असे शीर्षक असलेल्या वेब-सिरीज मधून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. एम एक्स प्लेअर वर १६ जुलै पासून ही सिरीज मोफत उपलब्ध आहे.

जूई आणि साकेत अशी प्रिया व उमेश यांच्या पात्रांची नावे आहेत. दोनच वर्षांपूर्वी लग्न झालेलं हे जोडपं नुकतेच स्वतःच्या नवीन घरात रहायला आले आहे. ट्रेलर खूप रिफ्रेशींग आहे. रोजच्या जीवनातील साध्या संवादातून केलेली विनोद निर्मितीमुळे ट्रेलर अधिक मजेशीर झाला आहे.

प्रिया आणि उमेश ह्यांची केमिस्ट्री भन्नाट आहे. वरुण नार्वेकर ह्यांनी या वेब-सिरीजचे लेखन-दिग्दर्शन केले आहे. नार्वेकर ह्यांनी पूर्वी अमेय वाघ आणि मिथीला पालकर ह्यांची प्रमुख भूमिका असलेला ‘मुरांबा’ (२०१७) हा चित्रपट दिग्दर्शित केला होता.

आणि काय हवं?... मध्ये प्रत्येकी २० मिनिटांचे सहा एपिसोड्स असतील.

Related topics

Trailer review