हिंदी अभिनेता दीपक डोब्रियाल पहिल्यांदाच मराठी चित्रपटात काम करत आहेत.
बाबा टीजर – संजय दत्त यांची पहिली मराठी निर्मिती आश्वासक आहे
मुंबई - 10 Jul 2019 5:16 IST


Keyur Seta
कोणत्याही चित्रपटात कथा, अभिनय खूप महत्वाच्या असतात, पण त्यासोबत पार्श्वसंगीत यासारख्या इतर तांत्रिक गोष्टी सुद्धा महत्वाच्या असतात जसे संजय दत्त निर्मित बाबा या मराठी चित्रपटात पाहायला मिळते.
टीजर पाहताना आपल्या चेहऱ्यावर स्मितहास्य असते आणि याचे श्रेय रोहन-रोहन यांच्या उत्कृष्ट पार्श्वसंगीताला जाते. टीजर एकदा पहिला तरी हे पार्श्वसंगीत लक्षात राहते.
टीजर पाहता वाटते की ही मूक-बधिर (आर्यन मेघजी) मुलाची गोष्ट आहे. तो महाराष्ट्रातल्या एका छोट्याश्या सुंदर गावात आपल्या वडिलां (दीपक डोब्रियाल) सोबत राहतो. त्याचे वडील सुद्धा मूक-बधिर आहेत. चित्तरंजन गिरी त्याच्या मित्राची भूमिका साकारत आहेत.
हा पहिलाच टीजर असल्यामुळे अजून कथानक काय असेल याची कल्पना येत नाही, पण तुमच्या मनात त्या लहान मुलाच्या आयुष्याबद्दल उत्सुकता निर्माण होते.
बाबा हा दीपक डोब्रियाल यांचा पहिला मराठी चित्रपट आहे, पण या चित्रपटात ते मूक-बधिर व्यक्तीच्या भूमिकेत असल्यामुळे त्यांना मराठी बोलावे लागणार नाही.
मेघजीचा हा पहिलाच चित्रपट आहे. एका ऑनलाइन कॉमेडी शो मध्ये त्याने सहभाग घेतला होता. चित्रपटात स्पृहा जोशी, अभिजीत खांडकेकर आणि नंदिता पाटकर यांच्या सुद्धा महत्वाच्या भूमिका आहेत.
राज आर गुप्ता दिग्दर्शित बाबा २ ऑगस्ट ला रिलीज होईल.