{ Page-Title / Story-Title }

News Marathi

रोहिणी हट्टंगडी वन्स मोर चित्रपटात वृद्ध पुरुषाच्या भूमिकेत दिसतील


रोहिणी हट्टंगडी यांनी आश्चर्यकारक ट्रान्सफॉर्मेशन केले आहे.

Keyur Seta

या अगोदर आपण काही अभिनेत्यांना भूमिकेसाठी आपल्यामध्ये शारीरिक बदल केल्याचे पहिले आहे. पा (२०१०) मध्ये अमिताभ बच्चन आणि रोबो २.० (२०१८) मध्ये अक्षय कुमार ही त्याची उदाहरणे. आता रोहिणी हट्टंगडी यांनी आपल्या पुढील मराठी चित्रपट वन्स मोर साठी पुरुषाची भूमिका साकारण्याचे आव्हान स्वीकारले आहे.

आजोबा असे शीर्षक असलेल्या या चित्रपटात त्या वृद्ध पुरुषाच्या भूमिकेत दिसतील. निर्मात्यांनी नुकतेच चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आणि त्यांचा हा अवतार आपल्याला आश्चर्यचकित करून सोडतो.

पोस्टरमध्ये एक महिला आहे यावर विश्वासच बसत नाही. सर्व मेकअप आर्टिस्ट आणि प्रोस्थेटिक आर्टिस्टने उत्कृष्ट काम केले आहे.

वन्स मोर मध्ये भारत गणेशपुरे, आशुतोष पत्की आणि धनश्री दळवी यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. अभिनेता नरेश महादेव बिडकर यांनी पहिल्यांदाच दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली आहे. या अगोदर त्यांनी चष्मेबहाद्दर (२००६), विजय दीनानाथ चौहान (२००९), शॉर्टकट: दिसतो पण नसतो (२०१५) या चित्रपटांत अभिनय केला आहे.

वन्स मोर १ ऑगस्ट ला रिलीज होईल.

Related topics

Poster review