{ Page-Title / Story-Title }

News Hindi

मिशन मंगल टीजर – अक्षय कुमार, विद्या बालन आणि तापसी पन्नू मुख्य भूमिकेत आहेत


जगन शक्ती दिग्दर्शित हा चित्रपट १५ ऑगस्टला रिलीज होईल.

Shriram Iyengar

मंगळयान मिशन ही भारताची अंतराळक्षेत्रातली सर्वात मोठी कामगिरी आहे. दिग्दर्शक जगन शक्ती त्यांच्या मिशन मंगल या चित्रपटातून भारताच्या या कामगिरीवर प्रकाश टाकणार आहेत.

अक्षय कुमार, विद्या बालन, कीर्ती कुल्हारी, तापसी पन्नू आणि नित्या मेनन यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटात आपल्याला असामान्य मिशनवर काम करणाऱ्या या सामान्य माणसांचे आयुष्य पाहायला मिळेल.

टीजरची सुरवात मंगळयान लॉन्चपासून होते. राकेश धवनच्या भूमिकेत दिसणारे अक्षय कुमार नंतर चित्रपटात काम करणाऱ्या इतर सहकाऱ्यांची ओळख करून दिली जाते.

विद्या बालन यांनी साकारलेली तारा शिंदे, कीर्ती कुल्हारी यांनी साकारलेली नेहा सिद्दीकी, तापसी पन्नू यांनी साकारलेली कृतिका अगरवाल, सोनाक्षी सिन्हा यांनी साकारलेली एका गांधी आणि नित्या मेनन यांनी साकारलेली वर्षा गौडा या महिलांचा हे मिशन यशस्वी करण्यामागे महत्वाचा वाटा होता.

टीजरमध्ये आपल्याला या सर्वांचे सामान्य दैनंदिन जीवन दाखवले आहे. एकीकडे कुटुंबाची काळजी घेणे तर दुसरीकडे आपले काम सांभाळणे या दोन्ही जबाबदाऱ्या उत्तमपणे पार पाडताना दिसत आहेत.

शर्मन जोशी आणि एच आर दत्तात्रय दोघेही या टीजरमध्ये दिसतात. शर्मन जोशी यांनी परमेश्वर नायडूची भूमिका साकारली आहे तर दत्तात्रय अनंत अय्यरची भूमिका साकारत आहेत. अय्यर घरी डोसा बनवतानाचे दृश्य नक्की आपल्या लक्षात राहते.

२००८ साली इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे चेयरमन जी माधवन नायर यांच्या कारकिर्दीमध्ये मंगळ मिशनची सुरुवात झाली आणि २०१४ ला नवे चेयरमन के राधाकृष्णन यांच्या कारकिर्दीमध्ये हे मिशन अमलात आणले गेले.

जगन शक्ती दिग्दर्शित मिशन मंगल ची प्रस्तुती फॉक्स स्टार स्टुडिओजने केली असून केप ऑफ गुड फिल्म्स, होप प्रोडक्शन्स आणि फॉक्स स्टार स्टुडिओजने चित्रपटाची निर्मिती केली आहे.

मिशन मंगल १५ ऑगस्टला रिलीज होईल.

Related topics

Teaser review