{ Page-Title / Story-Title }

News Hindi

विवेक ओबेरॉय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेत


सुरेश ओबेरॉय यांची सह-निर्मिती असलेल्या आणि ओमंग कुमार यांनी दिग्दर्शन केलेल्या पीएम नरेंद्र मोदी या बायोपिक मध्ये विवेक मोदींची भूमिका करणार आहेत.

Shriram Iyengar

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर बनलेला ऍक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर ह्या चित्रपटानंतर आता पंप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सुद्धा बायोपिक बनणार आहे.

ओमंग कुमार दिग्दर्शन करत असलेल्या चित्रपटाचे नाव पीएम नरेंद्र मोदी असे असून विवेक ओबेरॉय मोदींची प्रमुख भूमिका करणार आहेत.

मंगळवारी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. पोस्टरमध्ये मोदींचे लार्जर देन लाइफ असे व्यक्तिमत्व दाखवले आहे. 

विवेक ओबेरॉय यांनी नरेंद्र मोदी यांच्यासारखं दिसण्यासाठी पांढरी दाढी आणि केसं लावली आहेत. ओबेरॉय यांचे नाक त्यांच्या ओरिजिनल नाकापेक्षा खूपच वेगळे दिसते आणि पोस्टरमध्ये ते उठून दिसते.

पोस्टरच्या बॅकग्राऊंड मध्ये असंख्य हात दिसत आहेत. वर्ष २०१४ मध्ये आलेल्या मोदी लाटेचे दृश्यात्मक रूपांतर असावे.

सुरेश ओबेरॉय आणि संदीप सिंग ह्यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Related topics