News Hindi

सोनचिडिया ट्रेलर – अभिषेक चौबे यांचा चित्रपट राजकारण, विद्रोह आणि निष्ठा यांच्यातला संघर्ष दाखवतो


अभिषेक चौबे यांचा चंबळच्या डाकूंच्या आयुष्यावरचा हा चित्रपट ८ फेब्रुवारी २०१९ ला रिलीज होणार आहे.

Shriram Iyengar

मी तुमच्यापासून दूर पळू शकेन पण मी स्वतःपासून दूर कसा पळू शकतो? असा प्रश्न सुशांत सिंग राजपूतचा पात्र अभिषेक चौबेच्या सोनचिडिया चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये विचारते.

या ऍक्शनने भरपूर चित्रपटात दिग्दर्शकाने आपल्याला आणीबाणीच्या काळातल्या चंबळच्या डाकूंची कथा दाखवली आहे.

ट्रेलरची सुरुवात डाकू आणि आशुतोष राणा व सोबतीला असलेले इतर पोलीस यांच्यामध्ये होणाऱ्या शूटआऊट पासून होते.

ट्रेलर डाकूंच्या टीममधल्या मेम्बरच्या परस्पर संबंधांभोवती फिरतो. रणवीर शोरे डाकूंच्या मुख्याची भूमिका करत आहेत तर मनोज बाजपेयी एक थोडा वयस्कर पण अनुभवी दादा नावाच्या डाकूची भूमिका करत आहेत.

राजपूत एक आदर्शवादी तरुणाची भूमिका करत आहेत ज्याच्या भूमी पेडणेकरला वाचवण्याच्या निर्णयामुळे त्यांच्या टोळीमध्ये दरार पडते.

टीजरमध्ये दाखवलेला रेबेल (विद्रोही) हा शब्द ह्या अर्थाने वापरला असावा. ह्या चित्रपटाची कथा ही आणीबाणीच्या काळातली आहे. चित्रपटाची रिऍलिस्टिक मांडणी आणि क्रूर आशुतोष राणा ह्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता नक्कीच वाढली असेल.

हल्ली आशुतोष राणा जास्त चित्रपटात दिसत नाहीत, पण ह्या चित्रपटात त्यांना आपले अभिनय कौशल्य दाखवण्याचा खूप वाव आहे.

निर्माता रॉनी स्क्रूवाला यांच्या आर एस वी पी ह्या बॅनर खाली बनलेला हा चित्रपट ८ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. ट्रेलर खाली पहा.

 

Related topics