{ Page-Title / Story-Title }

News Hindi

द फकीर ऑफ वेनिस मधील गाणे: फरहान अख्तरच्या विलंबित डेब्यूमध्ये ए आर रहमान यांचे आध्यात्मिक गाणे


संत कबीर यांच्या दोह्यांवर बनलेल्या या गाण्याला ए आर रहमान यांनी संगीत दिले आहे.

Shriram Iyengar

आध्यात्मिक गाण्यांमध्ये ए आर रहमान यांचे बेस्ट वर्क दिसते. ऑस्कर विजेते रहमान यांनी ते जोधा अकबर (२००८) मधील 'ख्वाजा मेरे ख्वाजा' ते रॉकस्टार (२०११) मधील 'कून फाया कून' अश्या गाण्यांतून सिद्ध देखील केलेय.

फरहान अख्तर आणि अन्नू कपूर यांची प्रमुख भूमिका असलेल्या द फकीर ऑफ व्हेनिस चित्रपटात रहमान कबीरच्या दोहेला एका वेगळ्याच रूपात आपल्यासमोर आणतात.

गाण्यातून चित्रपटातील तत्वज्ञान मांडायचा प्रयत्न केला आहे. चित्रपटाची कथा फरहान अख्तर ह्या लबाडी आणि फसवेगिरी करणाऱ्या आणि ह्यामध्ये त्याचा साथीदार असणाऱ्या अन्नू कपूर ह्या दोन पात्रांभोवती फिरते.

ही फरहान अख्तर ह्यांची डेब्यू फिल्म होती, पण काही कारणांमुळे ती रिलीज होऊ शकली नाही आणि आता १० वर्षांनी हे फिल्म रिलीज होत आहे.

चित्रपटाच्या पहिल्या गाण्यात संत कबीर यांच्या दोहामधल्या काही फिलॉसॉफिकल ओळी वापरल्या आहेत. 'हद हद तपे सो औलिया' या ओळीतून कबीर एक तत्वज्ञानी व्यक्ती ज्ञानासाठी इकडेतिकडे भटकतोय असे सांगितले आहे. हे गाणे चित्रपटात प्रतीकात्मक पद्धतीने वापरलेले आहे.

गाण्यात अक्यूस्टिक गिटारचा वापर केलेला आहे. गाण्याच्या कॉम्पोसिशनची स्टाइल वेस्टर्न पद्धतीची असून त्यात जॅझ आणि इटालियन संगीताचा देखील वापर केलेला आहे. हे टीपीकल इंडियन गाण्यासारखे गाणे नसले तरी गाणे ऐकताना गोड वाटते.

दोहे आणि संगीताचे फ्युजन ऐकताना कधी कधी थोडे विचित्र वाटू शकते. त्यात रहमानचे उच्चार गाणे आणखी जटिल करते. पण एक वेगळा प्रयोग म्हणून हे गाणे नक्कीच ऐकू शकता.

द फकीर ऑफ व्हेनिस १८ फेब्रुवारी २०१९ ला रिलीज होणार आहे. गाणे खाली पहा.

 

Related topics