{ Page-Title / Story-Title }

News Hindi Tamil

कबीर खान यांच्या '८३ चित्रपटात तमिळ अभिनेता जीवा कृष्णमाचारी श्रीकांतच्या भूमिकेत?

Read in: English


एका रिपोर्टनुसार तमिळ अभिनेता जीवा कबीर खान यांच्या '८३ ह्या चित्रपटात माजी भारतीय सलामीवीर फलंदाज कृष्णमाचारी श्रीकांत ह्यांची भूमिका करणार आहे.

Haricharan Pudipeddi

१९८३च्या विश्वचषक विजयावर आधारित कबीर खान यांच्या '८३ ह्या चित्रपटासाठी अल्लू अर्जुन आणि विजय देवराकोंडा अश्या काही दक्षिण भारतीय अभिनेत्यांची नावे चर्चेत होती.

रणवीर सिंग ह्या चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारत आहेत आणि क्रिष श्रीकांत यांच्या भूमिकेसाठी अल्लू अर्जुन आणि विजय देवराकोंडा ह्या अभिनेत्यांना विचारण्यात आले होते.

परंतू आता आलेल्या विश्वनीय सूत्रांच्या बातमीनुसार लोकप्रिय तमिळ अभिनेता जीवाची ह्या भूमिकेसाठी निवड झाली आहे.

डेक्कन क्रोनिकल वर्तमानपत्रात आलेल्या बातमीनुसार कबीर खान श्रीकांत यांच्या भूमिकेसाठी तमिळ अभिनेताच हवा ह्यावर ठाम होते.

कबीर खान यांना एक तरुण आणि प्रतिभावान अभिनेत्याची गरज होती आणि जीवाच्या रूपात तो त्यांना सापडला.

जेव्हा जीवा यांना ऑक्टोबरमध्ये ह्या भूमिकेसाठी विचारणा केली तेव्हा ते लगेच चित्रपट करायला तयार झाले. जीवाने श्रीकांत यांच्या निगराणीखाली ट्रेनिंग देखील सुरु केली आहे.

जीवा दररोज २ तास क्रिकेटची प्रॅक्टिस करत आहेत. आणि फेब्रुवारी पर्यंत ही प्रॅक्टिस चालू राहील कारण मार्च मध्ये त्यांची शूटिंग सूरु होणार आहे.

रिलायन्स एंटरटेनमेंट, फँटम फिल्म्स आणि व्हिब्रि मीडिया ह्यांनी मिळून ह्या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

जीवा यांनी नुकतीच जिप्सी ह्या तमिळ चित्रपटाची शूटिंग आटोपली आहे. ह्या चित्रपटात ते एका भटकन्ती करणाऱ्या संगीतकाराची भूमिका करत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन जोकर (२०१६) राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या चित्रपटाचे दिग्दर्शक राजू मुरुगन यांनी केले आहे.

Related topics