News Bengali Hindi

मृणाल सेन, एका मॅव्हेरिक माइस्ट्रोचे वयाच्या ९५व्या वर्षी निधन


मृणाल सेन गेल्या काही वर्षांपासून आजारांनी त्रस्त होते. रविवारी सकाळी १०:३० वाजता हृदय विकाराचा झटका येऊन त्यांचे निधन झाले.

Roushni Sarkar

भारतीय चित्रपटसृष्टीचे मॅव्हेरिक माइस्ट्रो म्हणून ओळखले जाणारे मृणाल सेन यांचे रविवारी सकाळी १०:३० वाजता भवानीपुर येथे त्यांच्या राहत्या घरी हृदय विकाराचा झटका येऊन निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते.

मृणाल सेन यांचे पुत्र कुणाल सेन शिकागोमध्ये राहत असल्यामुळे त्यांच्या अखेरच्या क्षणी त्यांच्याबरोबर फक्त त्यांचे केअरटेकर होते.

इंडियन एक्सप्रेसच्या वेबसाईट वर आलेल्या रिपोर्टनुसार मृणाल सेन ह्यांची तब्येत अचानक खालावल्यानंतर त्यांच्या केअरटेकरने डॉक्टरला बोलावले, पण डॉक्टरांनी त्यांना हृदयविकाराच्या झटक्याने मृत घोषित केले.

मृणाल सेन ह्यांचे शव पीस हेवन मार्च्यूरी येथे ठेवण्यात आले आहे. २ जानेवारीला त्यांचे पुत्र कुणाल भारतात आल्यानंतर त्याच दिवशी मृणाल सेन ह्यांचा अंत्यसंस्कार करणार आहेत.

बंगाली चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी ही बातमी कळताच शोक व्यक्त केला. ममता शंकर, अंजन दत्त, सास्वत्त चॅटर्जी, अपर्णा सेन ह्यांसारख्या अनेक कलाकारांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन शोक व्यक्त केला.

मृणाल सेन यांनी भुवन शोम (१९६९), पडतिक (१९७३), मृगया (१९७६), दिन प्रतिदिन (१९७९), अकालेर संधान (१९८०) यांसारखे एव्हरग्रीन चित्रपट दिग्दर्शित केले होते.

त्यांनी त्यांच्या चित्रपटांतून चित्रपट बनवण्याचा ढोबळ साचाच बदलला नाही तर अनेक राजकीय प्रश्नांना वाचा फोडला. आणि त्यामुळेच त्यांचे बंगालच्या उत्कृष्ट दिग्दर्शकांमध्ये नाव घेतले जाते.

मृणाल सेन ह्यांच्या मृत्यूनंतर सत्यजित रे, रित्विक घटक,आणि मृणाल सेन ही नावाजलेली त्रयीच्या युगाचा अंत झाला असं म्हणता येईल.

अनेक राष्ट्रीय पुरस्कारांबरोबर मृणाल सेन ह्यांना भारत सरकारतर्फे १९८१ मध्ये पदमभूषण आणि २००५ साली दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

Related topics