{ Page-Title / Story-Title }

News Hindi

तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर यांच्या वूमनिया चित्रपटात दिग्दर्शक प्रकाश झा खलनायकाच्या भूमिकेत?

Read in: English | Hindi


अनुराग कश्यप दिग्दर्शित वूमनिया चित्रपटासाठी खलनायक म्हणून अभिनेते-दिग्दर्शक प्रकाश झा यांची निवड करण्यात आल्याची चर्चा आहे.

Shriram Iyengar

तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या वूमनिया चित्रपटात प्रकाश झा यांची खलनायक म्हणून वर्णी लागणार आहे अशी चर्चा आहे.

वूमनिया हे चित्रपटाचे तात्पुरते टायटल आहे. अजून तरी निर्मात्यांकडून कोणतीच अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. पण अनुराग कश्यप यांनी सांगितले की १० फेब्रुवारीपासून चित्रपटाच्या पहिल्या शेड्युल ला सुरुवात होईल. 

मुंबई मिरर मध्ये आलेल्या रिपोर्ट नुसार प्रकाश झाची खलनायक म्हणून निवड करण्यात आली आहे. प्रकाश झांनी त्याच्या राजनीती (२०१०) चित्रपटातून अभिनयामध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर प्रियांका चोप्डाची प्रमुख भूमिका असलेल्या जय गंगाजल (२०१६) या गंगाजल (२००३) च्या सिक्वेल मध्ये त्यांनी अभिनय केला. त्यानंतर जुस्तजू (२०१८) सारख्या शॉर्ट फिल्म्स मध्येसुद्धा त्यांनी अभिनय केला.

एका सूत्रानुसार प्रकाश झांना स्क्रिप्ट खूपच आवडले असून १० फेब्रुवारीपासून ते तापसी आणि भूमी पेडणेकर सोबत शूटिंगला सुरवात करतील. ते चित्रपटाविषयी खूपच उत्सुक आहेत आणि त्यांनी आपल्या भूमिकेसाठी तयारी सुरु केली आहे.

हा चित्रपट चंद्रो तोमर आणि त्यांच्या वहिनी प्रकाशी या दोघांच्या आयुष्यावर आधारित आहे. त्या दोघांनी वयाची साठी पार केल्यानंतर रायफल शूटिंगचे प्रशिक्षण घेऊन राष्ट्रीय स्तरावर शूटिंगचे अनेक पुरस्कार पटकावले. देशातल्या सर्वात वृद्ध नेमबाज म्हणून चंद्रो यांची ओळख आहे, आणि यावरूनच त्या दोघींना शूटर दादीज असे टोपणनाव पडले.

Related topics