{ Page-Title / Story-Title }

News Hindi

कार्तिक आर्यन आणि क्रिती सॅनन थिरकताहेत 'पोस्टर लगवा दो' च्या धुन वर


अक्षय कुमार आणि उर्मिला मातोंडकर यांच्या अफलातून (१९९७) या चित्रपटातील 'ये खबर छपवा दो' गाण्याचे हे नवीन रिमिक्स वर्जन आहे.

Keyur Seta

सध्या रिमिक्सच्या गर्दी मध्ये अक्षय कुमार आणि उर्मिला मातोंडकर यांच्या अफलातून (१९९७) चित्रपटातील 'ये खबर छपवा दो' या गाण्याचे सुद्धा रिमिक्स वर्जन आले आहे.

लक्ष्मण उतेकरांच्या लुका चुप्पी या चित्रपटातील 'पोस्टर लगवा दो' हे गाणे कार्तिक आर्यन आणि क्रिती सॅनन या दोघांवर चित्रित केले गेले आहे.

मिका सिंगने हे गाणे गायले आहे. मिका सिंग ने काहीच दिवसांपूर्वी आलेल्या सिम्बा (२०१८) चित्रपटातील 'आंख मारे' हे सुपरहिट गाणेसुद्धा गायले होते.

मिका सिंगच्या आवाजात काही नावीन्य नाही आहे. या गाण्यात पण त्यांची गायकी 'आंख मारे' आणि स्त्री (२०१८) मधील 'मिलेगी मिलेगी' या गाण्यांसारखीच आहे. सहगायिका सुनंदा शर्मा मात्र त्यांच्या मधुर आवाजाने जास्त प्रभावित करतात.

गाण्याच्या शब्दांच्या बाबतीत बोलायचे झाले तर नवीन शब्दांबरोबरच दोन कडव्यांमध्ये जुने शब्द जोडले आहेत. व्हाईट नाईट स्टुडिओज ने गाण्याची जी सांगीतिक पुनरर्चना केली ती उत्तमच आहे.

डोळ्यांना सुखावणारे 'पोस्टर लगवा दो' मध्ये दोन्ही प्रमुख कलाकारांनी डान्सर्सच्या स्टेप्स अगदी खुबीने मॅच केल्या आहेत. पंकज त्रिपाठी सोबत इतर पात्रं सुद्धा गाण्यात नृत्य करताना दिसतात.

ट्रेलरप्रमाणे गाण्यात सुद्धा कार्तिक आणि क्रिती मधली उत्तम केमिस्ट्री दिसून येते. कार्तिक आर्यनने थोडी अजून एनर्जी दाखवली असती तर गाणे आणखी चांगले दिसू शकले असते असे वाटत राहते. कार्तिक आणि क्रिती ही जोडी पहिल्यांदाच एकत्र काम करत आहे.

लुका चुप्पी हा लक्ष्मण उतेकर यांचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच हिंदी चित्रपट आहे. या अगोदर त्यांनी टपाल (२०१४) आणि लालबागची राणी (२०१६) या दोन मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते.

त्यांनी ब्लु (२००९), इंग्लिश विंग्लिश (२०१२), डिअर जिंदगी (२०१६), हिंदी मिडीयम (२०१७), १०२ नॉट आऊट (२०१८) या चित्रपटांचे छायाचित्रण सुद्धा केले आहे.

लुका चुप्पी १ ला मार्च रिलीज होईल. गाणे खाली पहा.

 

Related topics

Song review