{ Page-Title / Story-Title }

News Hindi

गलीबॉय चित्रपटातील गाणे 'दूरी' – हे रॅप मुंबई शहरात असलेल्या वर्ग भेदावर भाष्य करते


रणवीर सिंग यांनी गायलेल्या या गाण्याचे शब्द डिवाइन आणि जावेद अख्तर यांनी लिहले असून गाण्याला रिषी रीच यांनी संगीत दिले आहे.

Shriram Iyengar

फार क्वचितच हिंदी चित्रपटसृष्टीत असा म्युसिक अल्बम बनवला जातो की तो ऐकताच तुमचे होश उडून जातील. आणि झोया अख्तर यांचा गलीबॉय हा त्यातलाच एक अल्बम आहे.

झोया अख्तर यांच्या गलीबॉय मध्ये डिवाइन आणि नेझी यांच्या रॅप स्टाईल मध्ये बनलेली रॅप आणि कविता आहेत. 'दूरी' या नवीन रॅप गाण्यातून या रॅपर्सचे जग आणि मुंबई शहरातल्या लोकांमध्ये निर्माण झालेली अदृश्य दरी यावर भाष्य केले आहे.

मुंबईतल्याच रॅपर्सच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटात मुंबईमधल्या लोकांमध्ये वाढणारी आर्थिक दरी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

दररोज आयुष्याची लढाई लढून थकलेले आणि भुकेने व्याकुळ असे कामगार आणि लहान मुले ते बांधकामात असलेल्या नवनवीन इमारती आणि खोदलेले रस्ते ही एकाच शहरातली तफावत पाहून मन हेलावून जाते.

जावेद अख्तर आणि डिवाइन या दोघांनी आपल्या शब्दातून या परिस्थीविरुद्ध असलेली राग आणि निराशेची भावना अगदी योग्य पकडली आहे. या कवितेमध्ये एकटेपणा, जास्तीची हाव, महत्वाकांक्षा, श्रीमंत लोकांची समाजाच्या प्रति असलेली उदासीनता, वाढत भ्रष्टाचार या सर्व गोष्टींवर भाष्य केले आहे.

एक दुनिया में दो दुनिया 
उजाला एक अँधेरा 
एक सेठजी और एक चेला 

या ओळींमधून आपल्या मनात वर्षानोवर्षे दाबून ठेवलेल्या रागाला वाट करून दिले असे वाटते.

'अपना टाइम आयेगा' आणि 'मेरे गली में' या दोन गाण्यातुन व्यवस्थेविरुद्ध उभारलेल्या लढ्याला या नवीन गाण्यातील अत्यंत विखारी शब्दांमुळे आणखी जोर मिळतो.

रणवीर सिंग यांनी त्यांच्या नेहमीच्या ऊर्जेला नियंत्रित करून हे रॅप गायले आहे. रणवीरचा प्रवाह आणि नियंत्रण नक्कीच वाखाणण्याजोगे आहे पण अगदी योग्य शब्दावर जोर देऊन गायल्यामुळे गाण्याचा प्रभाव आणखी वाढतो.

डिवाइनने सुद्धा गाण्याला आवाज दिला आहे. या दोघांचं संयोग हे आपल्याला संमोहित करते.

रिषी रीच यांनी गाण्यातील शब्दांवर जास्त लक्ष जाईल अश्या पद्धतीचे संगीत दिले आहे. गाण्यातील बीट्सची टायमिंग अगदी योग्य आहे. उत्कृष्ट कॅमेरावर्क मुळे गाणे मनाला आणखी भिडते.

गलीबॉय १४ फेब्रुवारीला रिलीज होईल. सध्या 'दूरी' हे गाणं ऐका.

Related topics