News Marathi

डोक्याला शॉट टीजर – सुव्रत जोशी प्राजक्ता माळी या तमिळ मुलीशी लग्न करायला का घाबरत आहे?


दोन समाजामध्ये होणारे लग्न यावर चित्रपटातून हलक्याफुलक्या विनोदी पद्धतीने भाष्य केले आहे.

Keyur Seta

दिग्दर्शक शिवकुमार पार्थसारथी यांनी डोक्याला शॉट या पहिल्या चित्रपटात मराठी मुलगा आणि तमिळ मुलगी यांच्या लग्नामुळे काय समस्या होतात हे दाखवले आहे.

टीजरमध्ये सुव्रत जोशीच्या पात्राचे लग्न त्याचे प्रेम असलेली तरुणी (प्राजक्ता माळी) हिच्या बरोबर होते. लग्नामुळे तो खुश असतो परंतु जेव्हा त्याचा मित्र त्याला सांगतो की भविष्यात त्याचे आयुष्य कसे पूर्ण बदलून जाईल तेव्हा त्याच्याही मनात आपल्या वैवाहिक आयुष्याविषयी शंका निर्माण होते.

त्याच्या मित्राचे मत असते की अशी लग्न बाहेरून छान दिसत असली तरी त्यांच्या वैवाहिक आयुष्यात खूप समस्या असतात.

टीजर पाहून असे वाटते की दोन समाजामध्ये होणारे लग्न यावर चित्रपटातून हलक्याफुलक्या विनोदी पद्धतीने भाष्य केले आहे.

या चित्रपटाचा विषय आणि टू स्टेट्स (२०१४) या चित्रपटाचा विषय एकच आहे. टू स्टेट्स मध्ये आलिया भट ने दक्षिण भारतीय मुलीची तर अर्जुन कपूर ने पंजाबी मुलाची भूमिका केली होती.

सुव्रत जोशी यांची टीव्ही अभिनेता म्हणून ओळख आहे. गेल्या वर्षी रिलीज झालेल्या शिकारी चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी पार्टी (२०१८) या मराठी चित्रपटातसुद्धा अभिनय केला.

डोक्याला शॉट हा त्यांचा तिसरा चित्रपट आहे.

माळीने या अगोदर काही मराठी चित्रपटात काम केले आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी (२०१९) या चित्रपटात त्यांनी काशीबाईची भूमिका केली होती.

डोक्याला शॉट १ मार्चला रिलीज होईल. टीजर खाली पहा.

Related topics

Teaser review