{ Page-Title / Story-Title }

News Hindi

एक लडकी को देखा तो ऐसा लगा गाणे – राजकुमार राव यांचे ताल धरायला लावणारे 'गुड मॉर्निंग'


रोचक कोहली यांनी संगीत दिलेल्या या गाण्याला विशाल दादलानी आणि शेनोन डोनल्ड यांनी आवाज दिला आहे.

Shriram Iyengar

एक लडकी को देखा तो ऐसा लगा असे शीर्षक ज्या चित्रपटाचे असेल त्या चित्रपटाचे संगीतदेखील उत्तम असणारच यात शंका नाही.

याच चित्रपटातले 'गुड मॉर्निंग' या अगदी ठेका धरायला लावणारऱ्या गाण्यात राजकुमार राव कुटुंबातल्या सर्व मंडळींना एकत्र करून एक नाटक रचत आहे.

सोनम कपूरच्या प्रेमात पडलेल्या नाटककाराची राजकुमार राव यांची ही भूमिका त्यांच्या इतर भूमिकांपेक्षा खूप वेगळी आहे.

राजकुमार सकाळी सकाळी कुटुंबातल्या सर्व मंडळींना उत्साहित करत आहेत कारण त्याने रचलेल्या एक लडकी को देखा तो ऐसा लगा हे शीर्षक असलेल्या नाटकात सर्वानी त्याला मदत करायला हवी हा त्याचा उद्देश आहे.

या गाण्याची चित्रपटाच्या कथानकामध्ये खूपच महत्वाची भूमिका आहे असे वाटते.

या गाण्याचा टोन अगोदर रिलीज झालेल्या 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' आणि 'गुड नाल इश्क मीठा' या गाण्यांपेक्षा खूपच वेगळा आहे.

या गाण्याला आजच्या काळातले रॉक म्यूजिकचा साज चढवला आहे. रोचक कोहली यांनी विशाल दादलानी आणि शेनोन डोनल्ड ह्यांना या गाण्यासाठी अगदी योग्य गायक निडवले आहेत.

गाण्यात विशाल दादलानी यांची जास्त गायकी आहे व त्यांना अकुस्टिक गिटारची योग्य साथ लाभली आहे.

कोहली यांचे संगीत आपल्याला ठेका धरायला आणि गुणगुणायला भाग पाडते. गाण्याचे संगीत आणि पडद्यावर कलाकारांची दिसणारी एनर्जी अगदी योग्य पणे जुळतात.

पहिली दोन गाणी अगोदरपासून ओळखीच्या असलेल्या ट्यून वर बसवली असली तरी 'गुड मॉर्निंग' हे गाण्याचे संगीत आणि ट्यून एकदम अभिनव आहे.

शेली धर चोप्डा यांनी दिग्दर्शित केलेला एक लडकी को देखा तो ऐसा लगा १ फेब्रुवारी २०१९ रोजी रिलीज होणार आहे.

Related topics

Song review