{ Page-Title / Story-Title }

News Marathi

ती अँड ती ट्रेलर – सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे या दोघांमध्ये फसलेले पुष्कर जोग


चित्रपटाची मांडणी जरी विनोदी असली तरी कथानकात मात्र दम नाही.

Our Correspondent

दोन स्त्रियांमध्ये फसलेला एक पुरुष या कथानकावर याआधी सुद्धा अनेक हिंदी चित्रपट येऊन गेलेत. उदाहरणच द्यायचे झाले तर साजन चाले ससुराल (१९९६), सँडविच (२००६) हे चित्रपट सर्वानाच माहित असतील.

आता दिग्दर्शक मृणाल कुलकर्णी या विषयावर मराठीत चित्रपट घेऊन येत आहेत. अनय (पुष्कर जोग) नावाच्या व्यक्तीची ही कथा आहे. अनय चौथीत असताना प्रियंका (सोनाली कुलकर्णी) नावाच्या मुलीच्या प्रेमात पडतो, आणि आता खूप वर्षांनी तो प्रियांकाला लंडन मध्ये पुन्हा पाहतो.

पण आता एकच प्रॉब्लेम आहे; तो म्हणजे अनय लंडनला आपली पत्नी (प्रार्थना बेहरे) सोबत हनिमूनला आला आहे. प्रियंकाशी मैत्री करण्यासाठी तो तिला अविवाहित असल्याचं खोटंच सांगतो.

चित्रपटाची मांडणी जरी विनोदी असली तरी कथानकात मात्र दम नाही असे वाटत राहते. चित्रपटाचे प्रोडक्शन डिजाइन फारच उत्कृष्ट झाले आहे आणि चित्रपटात लंडन देखील फारच सुंदर दिसते.

जोग, कुलकर्णी आणि बेहरे यांनी त्यांच्या भूमिका उत्तम निभावल्यात असे ट्रेलर पाहून तरी वाटते. ट्रेलरमध्ये चित्रपटाचे संपूर्ण कथानकच सांगून टाकायचा मोह मात्र टाळायला हवा होता. ट्रेलर खाली पहा.

Related topics

Trailer review