{ Page-Title / Story-Title }

News Hindi

लुका चुप्पी ट्रेलर – क्रिती सॅनॉन आणि कार्तिक आर्यन यांचा लिव्ह-इन मध्ये राहण्यासाठी चाललेला खटाटोप


दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी या रोमँटिक कॉमेडी चित्रपटातून छोट्या शहरांमध्ये लिव्ह-इन मध्ये राहणाऱ्या जोडप्यांची कथा मार्मिक पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

Mayur Lookhar

मोठ्या शहरांमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिप मध्ये राहणे आता अगदी सामान्य गोष्ट झाली असली तरी छोट्या शहरातल्या लोकांसाठी ही अजूनही फार मोठी गोष्ट आहे हे क्रिती सॅनॉन आणि कार्तिक आर्यन यांच्या पात्रांना लुका चुप्पी मध्ये समजते.

या चित्रपटाने लक्ष्मण उतेकर हिंदी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहेत. लुका चुप्पी या रोमँटिक कॉमेडी चित्रपटाचा ट्रेलर आजच रिलीज झाला.

गुड्डू (कार्तिक आर्यन) ला लवकरात लवकर लग्न करायचे आहे तर मुलगी (क्रिती सॅनॉन) मात्र अगोदर नो-सेक्स लिव्ह-इन रिलेशनशिप मध्ये राहायची इच्छा व्यक्त करते.

परंतू त्यांच्या सर्व इच्छांवर पाणी फिरते जेव्हा मुलाचे संपूर्ण कुटुंबच त्यांच्याबरोबर राहायला येते. 'लिव्ह-इन सह-परिवार' ही चित्रपटाची टॅगलाईन अगदी योग्य आहे. ट्रेलर वरून असे वाटते की ही छोट्या शहरात लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याऱ्या लोकांवर मार्मिक टिप्पणी आहे.

दोघांची जोडी मोठ्या पडद्यावर छान दिसते. सॅनॉन ने याअगोदर बरेली की बर्फी (२०१७) चित्रपटात छोट्या शहरातल्या मुलीची भूमिका केली होती. मध्यप्रदेशातल्या ग्वालीयार आणि उत्तर प्रदेशमधल्या मथुरा या शहरांमध्ये हा चित्रपट शूट केलेला आहे.

कार्तिक आर्यनने साकारलेला गुड्डू अत्यंत भोळा आणि लग्नाला उतावळा आहे तर सॅनॉनने एका आत्मविश्वासू मुलीची भूमिका केली आहे. तिला लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल कुतूहल आहे म्हणनूच तिला कदाचित लिव्ह-इन मध्ये राहण्याची कल्पना सुचते.

या ट्रेलरसाठी वापरलेले अक्षय कुमार यांच्या अफलातून (१९९७) चित्रपटातले 'ये खबऱ' हे गाणे अगदी चपखल बसते.

अपारशक्ती खुराणा ने याअगोदर स्त्री (२०१८) चित्रपटात थोड़ा मंद तरीही मनातून अगदी स्वच्छ अश्या मित्राची भूमिका केली होती. या चित्रपटातदेखील निर्माता दिनेश विजान यांनी खुराणाला अश्याच पद्धतीच्या भूमिकेमध्ये कास्ट केले आहे.

विनय पाठकने कुटुंबातल्या सर्वात आदरणीय व्यक्तीची भूमिका केली आहे. एकवेळ प्रेयसी आणि प्रियकर पळून गेले तरी चालेल पण त्यांचं लिव्ह-इन मध्ये राहणं बिलकुलच मान्य नाही अशी त्यांची विचारसरणी आहे. ट्रेलरमध्ये अगदी काही क्षणासाठीच पंकज त्रिपाठींचे दर्शन होते.

ट्रेलरवरून तरी असे वाटते की हा एक हलकाफुलका रोमँटिक-ड्रामा चित्रपट आहे. कदाचित खूप जास्त अपेक्षा असल्यामुळे ट्रेलर अपेक्षेइतका चांगला नाही असे वाटत राहते. गुड्डूचे कुटुंब, खासकरून त्याची आई, मेलोड्रॅमॅटिक वाटते.

१ मार्च ला रिलीज होणाऱ्या लुका चुप्पी ला त्याच दिवशी रिलीज होणाऱ्या सुशांत सिंग राजपूत अभिनीत सोनचिडिया चित्रपटाचे तगडे आव्हान असेल.

ट्रेलर खाली पहा.

Related topics

Trailer review