{ Page-Title / Story-Title }

News Marathi

सचिन तेंडुलकरनी आमचा चित्रपट पहिला तर मी निःशब्दच होईन – प्रियदर्शन जाधव


मी पण सचिन चित्रपटात स्वप्नील जोशी यांनी सचिन पाटील नावाच्या पूर्व क्रिकेटरची भूमिका केली आहे.

Keyur Seta

प्रथमच दिग्दर्शन करणाऱ्या श्रेयस जाधव यांचा मी पण सचिन हा चित्रपट क्रिकेट या खेळावर बेतला आहे.

चित्रपटात स्वप्नील जोशी सचिन पाटील नावाच्या व्यक्तीची भूमिका करत आहेत. पण ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे चित्रपटात सचिन तेंडुलकरचा सुद्धा उल्लेख आहे.

चित्रपटात स्वप्नील जोशी बरोबर प्रियदर्शन जाधव यांची सुद्धा महत्वाची भूमिका आहे. सचिन तेंडुलकर यांनी आमचा चित्रपट पाहावा, अशी इच्छा प्रियदर्शन जाधव यांनी सिनेस्तान कडे व्यक्त केली.

"सचिन तेंडुलकर यांनी आमचा चित्रपट पहिला तर मी निःशब्दच होईन," असे प्रियदर्शन जाधव म्हणाले. "मी देवचारणी प्रार्थना करतो की त्यांनी आमचा चित्रपट पाहावा. जगातल्या प्रत्येक क्रिकेट चाहत्यांसाठी सचिन तेंडुलकर देव आहेत. चित्रपटात त्यांचा आपल्या स्वप्नांच्या मागे धावा हा संदेश दिला आहे. हा चित्रपट त्यांच्या आयुष्यावर बेतला नसला तरी क्रिकेटशी संबंधित असल्याने त्यांनी हा चित्रपट पाहावा अशी माझी इच्छा आहे."

चित्रपटात सचिन पाटीलचा जीवलग मित्र विकी आमलेची भूमिका प्रियदर्शन जाधव करत आहेत. "२००० आणि २०१९ या दोन काळामध्ये कथा घडत असल्यामुळे आम्हाला या दोन काळातली पात्रं पडद्यावर साकारायची होती," असे ते म्हणाले.

मी पण सचिन मध्ये एका दुखापतीमुळे जोशीच्या पात्राला क्रिकेट सोडावे लागते, पण त्याचे लॉर्ड्सच्या मैदानावर स्वप्न अजून जिवंत आहे.

चित्रपटात कल्याणी मुळे जोशींच्या पत्नीची भूमिका करत आहेत. रवी जाधव यांच्या न्यूड (२०१८) चित्रपटातील अभिनयासाठी प्रेक्षक आणि परीक्षक अश्या दोघांकडून वाहवा मिळवल्यानंतर हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे.

मी पण सचिनमध्ये प्रियदर्शन जाधव यांना नागपुरी लहेजामध्ये बोलायचे आव्हान होते. "मला नागपुरी लहेजाबद्दल काहीच माहिती नव्हते. मी याआधी कोणत्याच चित्रपट, नाटक, सीरिअल अथवा कॉमेडी स्किट मध्ये सुद्धा कधी नागपुरी लहेजामध्ये बोललो नव्हतो," असं ते म्हणाले.

"आमचे दिग्दर्शक नागपूरचे असल्याने त्यांनी खूप मदत केली. नागपुरी भाषेत मला ला मले म्हणतात तसेच प्रत्येक वाक्यामागे बे लावतात अश्या छोटा छोट्या गोष्टी लक्षात ठेवून मी दिलेले संवाद म्हटले."

मी पण सचिन सिनेमाची टीम ने काही होतकरू क्रिकेटर्स बरोबर शिवाजी पार्कच्या मैदानात एक क्रिकेट ची मॅच खेळली.

Related topics