{ Page-Title / Story-Title }

News Hindi

अनुराग बासूंच्या पुढील चित्रपटात फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा पुन्हा एकत्र


चित्रपटात अभिषेक बच्चन आणि राजकुमार राव सोबत पंकज त्रिपाठी आणि आदित्य रॉय कपूर यांच्या सुद्धा भूमिका आहेत.

शटरबग्स इमेजस्

Our Correspondent

दंगल गर्लस् म्हणून प्रसिद्ध झालेल्या फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा अनुराग बासू यांच्या चित्रपटात पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत.

६ सप्टेंबर २०१९ ला रिलीज होणाऱ्या या चित्रपटाचे नाव अजून निश्चित नाही आहे.

शेख आणि मल्होत्रा यांच्या व्यतिरिक्त चित्रपटात अभिषेक बच्चन, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, आदित्य रॉय कपूर हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत आहेत.

भूषण कुमार यांच्या टी-सिरीज या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे.

निर्मात्यांनी आपल्या ऑफिशिअल स्टेटमेंट मध्ये म्हटले की "आयुष्यातल्या काही न टाळता येणाऱ्या घटनांभोवती फिरणारा एक ऍक्शन कॉमेडी चित्रपट आहे. भारतातल्या मेट्रो शहरांमध्ये घडणाऱ्या चार वेगवेगळ्या कथा या चित्रपटात दाखवणार आहेत."

हा चित्रपट अनुराग बासू यांच्या लाइफ इन अ मेट्रो (२००७) या चित्रपटाचा सिक्वेल आहे अशी देखील चर्चा आहे. निर्मात्यांकडून मात्र अजून तरी तशी काहीच घोषणा करण्यात आलेली नाही.

बासू ने चित्रपटाचा काही भाग अभिषेक बच्चन बरोबर मुंबईमध्ये आणि राजकुमार राव व शेख बरोबर भोपाळमध्ये अगोदरच शूट केला आहे. ओफिशीअल स्टेटमेंटनुसार चित्रपटात बासू अजून काही कलाकारांची कास्टिंग करणार आहेत.

टी-सीरीज सोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल बोलताना बासू म्हणाले, "गंभीर विनोदी या प्रकारात मोडणाऱ्या माझ्या या चित्रपटासाठी भूषण कुमार यांच्यासारखे निर्माते लाभणे हे माझे भाग्यच आहे. आम्ही एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ असली तरी मला तसे बिलकुल भासले नाही. या नवीन पिढीच्या टॅलेंटेड कलाकारांबरोबर काम करतोय याचा आनंदच आहे, परंतू संगीताच्या बाबतीत मात्र माझा विश्वास माझे जुने साथीदार प्रीतम यांच्यावरच आहे."

दंगल (२०१६) नंतर सान्या मल्होत्राने पटाखा (२०१८) आणि बधाई हो (२०१८) या चित्रपटात काम केले आहे तर फातिमा शेख ने थग्स ऑफ हिंदोस्तान (२०१८) या चित्रपटात काम केले आहे.

Related topics