{ Page-Title / Story-Title }

News Hindi

टोटल धमाल ट्रेलर – अजय देवगण, अनिल कपूर, माधुरी दीक्षित या साहसपटामध्ये प्रमुख भूमिकेत


दिग्दर्शक इंद्र कुमार यांनी सी जी आय चा वापर करून बनवलेला हा चित्रपट तुम्हाला १९९० च्या दशकातील चित्रपटांची आठवण करून देईल.

Sonal Pandya

सिंह, वाघ आणि हिंदी फिल्म स्टार्सची गट्टी जमणे तसं कठीणच, परंतू इंद्र कुमार यांनी त्यांच्या टोटल धमाल या विनोदी साहसपटामध्ये मात्र या प्राण्यांची आणि फिल्मस्टार्स ची ही विचित्र गट्टी जमवून आणली आहे.

या चित्रपटात हिंदोळ्या खाणारे पूल, दूरवर पसरलेले वाळवंट आणि झू मधले विचित्र प्राणी असा सगळा गोतावळा जमवून आणला आहे.

निर्माते-दिग्दर्शक इंद्र कुमार यांच्या धमाल फ्रँचाइज मधल्या या तिसऱ्या चित्रपटात अगोदरच्या दोन चित्रपटातले अर्शद वारसी, रितेश देशमुख आणि जावेद जाफरी बरोबर अजय देवगण, अनिल कपूर व माधुरी दीक्षित नेने या तीन कलाकारांची एन्ट्री झाली आहे.

विमान अपघातात मृत्यू होणाऱ्या व्यक्तीच्या शेवटच्या शब्दावर विश्वास ठेवून हे सर्व कलाकार ५० कोटी रुपयांच्या खजिन्याच्या शोधात निघतात. दोन किंवा तीन च्या गटात विभागून ते सर्व खजिन्याच्या शोधात निघतात.

परंतू ते म्हणतात ना की संकटांशिवाय जीवनात मजा ती काय? तसंच त्यांच्या या शोधमोहिमेत तुटलेला पूल, क्विकसैंड आणि त्यांच्या सर्वांच्या मरणावर टपलेला एक गँगस्टर (महेश मांजरेकर) अशी संकटं येतात.

सी जी आय चा वापर करून बनवलेला हा चित्रपट तुम्हाला १९९० च्या दशकात घेऊन जातो जेव्हा अश्या पद्धतीचे अनेक कलाकारांचा भरणा असलेल्या निर्बुद्ध विनोदी चित्रपटांचा बॉक्स ऑफिस वर दबदबा होता.

अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित या १९९० च्या दशकातील सुपरहिट जोडीला खूप वर्षांनी चित्रपटात एका टिपिकल विवाहित जोडप्याप्रमाणे भांडताना पाहणं खरंच सुखावह आहे.

१९९० च्या दशकातला आणखी एक लोकप्रिय अभिनेते म्हणजे जॉनी लिव्हर. ट्रेलरमध्ये त्यांची सुद्धा काही विनोदी दृश्ये आहेत. बाकीचे कलाकारसुद्धा खजिना मिळवण्यासाठी जीवाचा आटापिटा करत आहेत.

चित्रपटात कर्ज़ (१९८०) चित्रपटातील 'पैसा ये पैसा' हे गाणे सुद्धा आहे. त्यामुळे ज्यांना १९९० च्या दशकातल्या चित्रपटांची खूप आवड आहे त्यांच्यासाठी हा चित्रपट म्हणजे एक परफेक्ट गिफ्ट आहे.

पारितोष पेंटर, वेद प्रकाश, बंटी राठोड यांनी मिळून या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लिहले आहे. २२ फेब्रुवारी २०१९ ला टोटल धमाल थिएटर्समध्ये रिलीज होईल. खाली चित्रपटाचा ट्रेलर पहा आणि तुम्ही चित्रपट पाहण्यास किती उत्सुक आहात ते आम्हाला कळवा.

Related topics

Trailer review